Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुशाफिरीनं मागचं वर्ष माझ्यासाठी…” २०२४ वर्षासाठी लिहिलेल्या अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत

कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्याने २०२४ वर्षाबद्दल खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. फिल्मी करियरमध्ये २०२४ या वर्षात मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये भाष्य केलंय.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 01, 2025 | 04:43 PM
"मुशाफिरीनं मागचं वर्ष माझ्यासाठी..." २०२४ वर्षासाठी लिहिलेल्या अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत

"मुशाफिरीनं मागचं वर्ष माझ्यासाठी..." २०२४ वर्षासाठी लिहिलेल्या अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता किरण माने ह्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नाटक, चित्रपट आणि मालिका या तिनही माध्यमातून अभिनेत्याने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्याने २०२४ वर्षाबद्दल खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. फिल्मी करियरमध्ये २०२४ या वर्षात मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये भाष्य केलं आहे.

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये कलाकार मंडळी दाखवणार पाक कौशल्य, कोण कोण सेलिब्रिटी होणार सहभागी ?

 

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने मालिकेमध्ये साकारलेल्या पात्रांचे फोटो पोस्ट केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिले की,

” ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेतल्या अभिमान साठे या भुमिकेसाठी मिळालेलं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं अवार्ड… सन मराठीवरील ‘तिकळी’ मालिकेत साकारलेला बाबाराव खोत हा खतरनाक व्हिलन… कलर्स मराठीवरील सध्या सुरू असलेल्या ‘लई आवडतेस तू मला’ मध्ये साकारत असलेला तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक, कणखर कामगार नेता आणि तेवढाच हळवा बाप आप्पा धुमाळ… रिलीज झालेले ‘तेरवं’ आणि ‘नाद’ हे सिनेमे… आणि नवीन वर्षात येऊ घातलेल्या आणखी तीन जबरदस्त सिनेमांमधील तगड्या भुमिका… हे सरत्या वर्षाचं अभिनयक्षेत्रातलं संचित ! परिवर्तनाच्या चळवळीत महाराष्ट्रभर फिरुन दिलेली असंख्य व्याख्यानं…” “धुळ्यापासून हुपरीपर्यंत, अंमळनेरपासून भोरपर्यंत आणि नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत पायाला भिंगरी लावून केलेलं तथागत बुद्ध, तुकाराम महाराज आणि शिव शाहु फुले आंबेडकरी विचारांच्या प्रसाराचं मनाला आनंद देणारं काम… ‘माणूस’पण संकटात आणणार्‍या काळात निडरपणे पसरवलेला मानवतेचा, सलोख्याचा, प्रेमाचा संदेश… विद्रोही साहित्य संमेलनातल्या भाषणानंतर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेऊन केलेला जल्लोष… प्रबोधनकार ठाकरेंचा विचार काळजात घेऊन थेट मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेनेत केलेला प्रवेश… लोकसभा निवडणुकीत वादळी प्रचारसभांमध्ये सहभाग घेऊन, ‘चारसो पार’चा माज उतरवण्यात उचललेला खारीचा वाटा…” “इव्हीएम घोटाळ्यामुळे कलंकीत झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कष्टकरी बहुजनांच्या सन्मानासाठी दिलेली कडवी झुंज… तमाम महाराष्ट्रानं दिलेलं सह्याद्रीएवढं प्रेम… ज्यात आवड आहे, ज्याचा ध्यास आहे अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये रसरसून, मनमुराद, दिलखुलास केलेल्या मुशाफिरीनं मागचं वर्ष माझ्यासाठी अविस्मरणीय ठरलं ! वर्ष संपता-संपता मिळालेला ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार’ म्हणजे, “तुका म्हणे झाले सायासाचे फळ… सरली ते वेळ काळ दोन्ही !” नव्या वर्षात नव्या दमानं नवी आव्हानं झेलून… हसतमुखानं सगळ्या संकटांना धोबीपछाड देऊन… यशाचा झेंडा असाच फडकत ठेवण्यासाठी शंभर हत्तींचं बळ सोबत घेऊन सज्ज झालोय.”

पुन्हा एकदा हास्यजत्रेची टीम प्रेक्षकांना खळखळून हसवणार, चित्रपटातून देणार धमाल मनोरंजनाची ट्रीट

Web Title: Actor kiran mane shared post about 2024 in filmy career and get awards information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 04:43 PM

Topics:  

  • Kiran Mane
  • marathi actor

संबंधित बातम्या

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
1

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना
2

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट
3

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट

दिवंगत अभिनेते राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट, ‘गोट्या गँगस्टर’चा टीझर लाँच
4

दिवंगत अभिनेते राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट, ‘गोट्या गँगस्टर’चा टीझर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.