Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ट्रेन कायमची सुटावी असं वाटायचं, पण…”, कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

काही तासांपूर्वीच कुशलने इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये त्याने आपल्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांवर भाष्य केलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 27, 2024 | 08:29 PM
"ट्रेन कायमची सुटावी असं वाटायचं, पण...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

"ट्रेन कायमची सुटावी असं वाटायचं, पण...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. कुशल आपल्या कामाव्यतिरिक्त अनेक मजेशीर पोस्ट शेअर करत असतो. कधी ती पोस्ट बायको संदर्भात तर कधी मित्रांसंदर्भात पोस्ट लिहित असतो. काही तासांपूर्वीच कुशलने इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये त्याने आपल्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांवर भाष्य केलं आहे.

हे देखील वाचा – अबब… ‘लापता लेडीज’च्या शुटिंगसाठी ‘या’ अभिनेत्याने खाल्ले १६० पान, स्वत:च शेअर केला किस्सा

प्रत्येकाच्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुंबई लोकलचा एक मोलाचा वाटा आहे. मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे प्रवासासाठी उत्तम आणि सुखकर पर्याय ठरला आहे. अभिनेत्याने याच लोकलचं उत्तम उदाहरण देत आयुष्याबद्दल काही भाष्य केलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये कुशल म्हणतो, “सुरवातीच्या काळात मी ट्रेनने भरपूर प्रवास केला. तिथले पाळायचे नियम आणि टाळायचे नियम मला ट्रेन्सच्या टाईमटेबल सारखेच पाठ होते. ट्रेनमध्ये भजनात रमणारे दर्दी पाहिले. तशीच डब्यातली गुंडा-गर्दी पाहिली.”

सौजन्य – कुशल बद्रिके इन्स्टाग्राम स्टोरी

” काळ्या कोटाची भीती त्या प्रवासात जी मनात भरली ती पुढे आयुष्याच्या प्रवासात कायम राहिली. “बकासुरा सारखी माणसांचे लोंढे गिळणारी ही ट्रेन. कुठेतरी जाऊन पुन्हा माणसं ओकते.” असले भयंकर विचार तेव्हा मनात यायचे. आपली ट्रेन सुटू नये म्हणून रोज धावपळ करणाऱ्या मला ही ट्रेन एकदाची कायमची सुटावी असं वाटत राहायचं. आता ट्रेन कायमची सुटली… पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्या सारखं झालंय, ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर उतरून निघून जातात. सहप्रवासी बदलत राहतात. प्रवास मात्र कायम असतो!! – सुकून.”

हे देखील वाचा – सूरजच्या घरच्यांनी बिग बॉस सदस्यांनाच नाही तर महाराष्ट्राला रडवले, भावुक प्रोमो पाहून डोळे पाणावले

इन्स्टा स्टोरी शेअर करताना अभिनेत्याने त्याचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केलेला आहे. दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’नंतर कुशल बद्रिके ‘सोनी टीव्ही’वरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात पाहायला मिळाला. या कार्यक्रमातील कुशल, हेमांगी आणि गौरवच्या स्किटचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असायचे.

Web Title: Actor kushal badrike shared strruggle related insta story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 08:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.