फोटो सौजन्य - Social Media
या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. गुरु दिवेकरने ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून एक्सजीट घेतली आहे तर त्याजागी अभिनेता रुचिर गुरव याने या मालिकेत एंट्री घेतली आहे. आता मालिकेतील ‘सोहम’ हे पात्र रुचिर साकारणार आहे. रुचिरने त्याच्या @_ruchir14 या सोशल मीडिया हॅण्डलवरून या गोष्टीची माहिती दिली आहे. इतकेच नव्हे तर पोस्टखाली कॅप्शनही नमूद केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये ‘Hello guys SO-HUM is back! Watch me as “Soham” in Savlyachi Janu Savali at 6:30 pm only on @zeemarathiofficial!’ असे नमूद केले आहे. याचा अर्थ की “नमस्कार मित्रांनो! सो-हम परत आलाय! मला ‘सावल्याची जणू सावली’ या मालिकेत ‘सोहम’ या भूमिकेत पहा ते ही साडे सहा वाजता फक्त आपल्या ZEE मराठीवर”
रुचिरची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहते मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि तो उत्साह अतिशय उसळून आला आहे. याची साक्ष स्वतः चाहते कमेंट्सच्या माध्यमातून देत आहेत. त्याला TV वर सोहम हे पात्र साकारताना पाहण्यासाठी चाहतेमंडळी आतुर झाले आहेत.






