Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’नंतर सचित पाटील करणार “असंभव” चित्रपटाचे दिग्दर्शन

‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटांनंतर आता ‘असंभव’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. यासोबत सचितने या सिनेमाची पटकथा लिहिली असून तो या चित्रपटाची निर्मितीही करणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 19, 2025 | 02:00 PM
‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’नंतर सचित पाटील करणार "असंभव" चित्रपटाचे दिग्दर्शन

‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’नंतर सचित पाटील करणार "असंभव" चित्रपटाचे दिग्दर्शन

Follow Us
Close
Follow Us:

सध्या मराठी सिनेसृष्टीत एकाच चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे, तो म्हणजे ‘असंभव’. हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला वहिला चित्रपट आहे ज्याचं शुटिंग नैनीतालमध्ये सुरु आहे. नैनीतालच्या ० ° आणि -३° सेल्सियस सारख्या गोठवणाऱ्या थंडीच्या वातावरणात सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट, संदीप कुलकर्णी आणि पुष्कर श्रोत्री या सिनेमाचं शुटिंग करीत आहेत.या चित्रपटाबद्दल आणखी एक खास बाब समोर आली आहे, ती म्हणजे मल्टी टॅलेंटेड अभिनेता, सचित पाटिल

संघर्षांपासून प्रसिद्धीपर्यंत… कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी शेअर केल्या ‘जंजीर’च्या आठवणी

या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सचित पाटिलसोबत त्यांचा जिवलग मित्र पुष्कर श्रोत्री या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. सिनेमाबद्दल अभिनेता पुष्कर श्रोत्री ,,अतिशय उत्साही आहेत, याबद्दल बोलताना ते म्हणाले, “जेव्हा या चित्रपटाची गोष्ट कपिल भोपटकर आणि सचित पाटील यांनी मला ऐकवली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली की चित्रपटाची कथा सचितच्या अंगात पूर्णपणे भिनली आहे. सचित हा माझा अनेक वर्षांपासूनचा खूप जीवलग मित्र आणि माझ्या कुटुंबाचा एक भाग असल्यामुळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असताना आमच्यातल्या मैत्रीचा आणि आम्हा दोघांच्या चित्रपट विषयक कलात्मक विचारांचा एकत्रित असा फायदाच “असंभव”साठी करून घ्यायचा, हे आम्ही ठरवलं.

आणि नैनिताल मधलं चित्रीकरण करत असताना चित्रपटासाठी आम्ही दोघांनी त्याचा पुरेपूर वापर करून घेतला. आज हा चित्रपट ज्याप्रकारे आकार घेत आहे, त्यातून पुन्हा ही गोष्ट सिद्ध झाली की समविचारी जुने मित्र जर एखाद्या चित्रपटासाठी एकत्र आले, तर तो चित्रपट सर्व बाजूने समृद्ध होऊ शकतो. ‘असंभव’ या चित्रपटामुळे नितीन प्रकाश वैद्य – सचित पाटील यांची मुंबई-पुणे फिल्म एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत – तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस ह्या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. ‘वळू’, ‘नाळ’, ‘एकदा काय झालं ’, ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ ते ‘लाईक आणि सबस्क्राईब’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ या चित्रपटाला लाभणार आहे.

शिवानी-अंबरच्या लग्नपत्रिकेची पहिली झलक, लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

‘असंभव’ चित्रपट आणि सचितबद्दल निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले की, “माझी आणि सचितची अनेक वर्षांपासून एकत्र काम करण्याची इच्छा होती, तो योग जुळून आला ‘असंभव’च्या निमित्ताने. कथा ऐकून ठरवलं की या चित्रपटाला योग्य न्याय द्यायचा असेल, तर निर्मिती आपणच करायला हवी. सचितचा कलात्मक दृष्टिकोण आणि माझा चित्रपट निर्मिती क्षेत्रातील अनुभव याची उत्तम भट्टी जमल्यामुळे आम्ही ‘मुंबई-पुणे फिल्म्स एन्टरटेन्मेंट’ या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. माझं आणि सचितचं ट्युनिंग एकदम मस्त आहे. कलेसंदर्भात त्याला काय अपेक्षित आहे हे मला कळतं, आणि योग्य बजेटमध्ये काम कसं करायला हवं हे त्याला उत्तम रित्या कळतं. आमच्या जोडीला निर्माते म्हणून शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई हे देखील आहेत.” आता ‘असंभव’ हा चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट, या कलाकृतीत काही नवं गूढ पाहायला मिळणार की एखाद्या जुन्याच विषयाशी याचे धागेदोरे जुळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसाठी आणि या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार त्यासाठी प्रतिक्षा आहे ती चित्रपट प्रदर्शित होण्याची. हा चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, तोपर्यंत ‘असंभव’चं रहस्य उलगडणं असंभवच आहे.

Web Title: Actor sachit patil asambhav marathi movie in as a directorial script writer and producer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
1

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
2

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
3

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

पहिला चित्रपट अन् पहिलाच फिल्मफेअर अवॉर्ड; ‘या’ अभिनेत्याला “येक नंबर” चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार
4

पहिला चित्रपट अन् पहिलाच फिल्मफेअर अवॉर्ड; ‘या’ अभिनेत्याला “येक नंबर” चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.