Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

नव्या पिढीच्या रोमँसची झलक देणारा हा पोस्टर पाहताच शूटिंग लंडनमध्ये झाल्याची जाणीव प्रेक्षकांना होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 15, 2025 | 04:02 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक पातळीवर मराठी सिनेमाची छाप उमटवण्याचा निर्धार केलेल्या निर्माते सचिन नाहर आणि अमोग मलाविया यांनी प्रेक्षकांसाठी एक हटके प्रोजेक्ट साकारला आहे. यूकेमध्ये शूट झालेला नवा मराठी चित्रपट ‘असा मी अशी मी’ हा त्यांच्या कल्पकतेचा आणि मेहनतीचा उल्लेखनीय नमुना आहे. या सिनेमाचा पोस्टर नुकताच रिलीझ झाला. पोस्टरवर असलेले कलाकार तेजश्री प्रधान आणि अजिंक्य रमेश देव यांचा डॅशिंग लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. नव्या पिढीच्या रोमँसची झलक देणारा हा पोस्टर पाहताच शूटिंग लंडनमध्ये झाल्याची झटपट चाहत्यांना जाणीव होते. या न्यू-एज प्रेमकथेची कथा नेमकी काय असेल याविषयी आता प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा येत्या २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे.

ही भव्य निर्मिती मॅक्समस लिमिटेड या प्रतिष्ठित बॅनर्स अंतर्गत साकारली आहे. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, उत्कृष्ट लोकेशन्स, आणि उच्च दर्जाचा अभिनय एकत्र आणत ही टीम मराठी चित्रपटांचे रूप पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. निर्माते सचिन नाहर आणि अनिश शर्मा तसेच सह निर्माते अमोग मलाविया, सुरेश गोविंदराय पै यांचे ध्येय केवळ मनोरंजन देण्यापुरते मर्यादित नसून मराठी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचा सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आहे. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे आणि गुणवत्ता जपण्याच्या वृत्तीमुळे ‘असा मी अशी मी’ एक खास ओळख निर्माण करतो. इतकच नव्हे तर निलेश मोहरीर ह्यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.

Bigg Boss 19 : खरं की काय? कुनिका सदानंद मालती चहरला म्हणाली ‘लेस्बियन’ तान्या मित्तलला सांगितली की, “मला खात्री आहे…”

चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल शेटगे यांनी केले असून, मुख्य भूमिकेत अनुभवी अभिनेता अजिंक्य रमेश देव, प्रेक्षकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान, तसेच इतर भारतीय आणि ब्रिटिश कलाकारांची प्रभावी फळी दिसणार आहे. विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या या कलाकारांमुळे चित्रपटाला एक सुंदर आंतरराष्ट्रीय रंग प्राप्त झाला आहे.

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित

यूकेच्या देखण्या लोकेशन्समध्ये विणलेली ही हळुवार प्रेमकहाणी आधुनिक नातेसंबंधांना भावनिक अंगाने मांडते. जे नक्कीच प्रेक्षकांना थिएटरमध्ये एक ताजेतवाने अनुभव देईल.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘असा मी अशी मी’ हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहे. मराठी सिनेमाला ग्लोबल टच देणारी ही निर्मिती प्रेक्षकांसाठी एक खास आणि अविस्मरणीय भेट ठरणार आहे.

Web Title: Poster of asa me ashi me launched dashing look catches the attention of the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘माझा १२ वर्षांचा मुलगा…’ ब्लू साडी गर्लचे एआय फोटो व्हायरल, अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
1

‘माझा १२ वर्षांचा मुलगा…’ ब्लू साडी गर्लचे एआय फोटो व्हायरल, अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित
2

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित

‘निर्धार’चे धमाकेदार युथफूल गाणे प्रदर्शित; ‘वंदे मातरम…’ रसिकांना भुरळ घालणार!
3

‘निर्धार’चे धमाकेदार युथफूल गाणे प्रदर्शित; ‘वंदे मातरम…’ रसिकांना भुरळ घालणार!

Sun Marathi Serial: गोड आठवणी, लहानपणाची धमाल,बालदिनानिमित्त प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी शेअर केल्या आठवणी
4

Sun Marathi Serial: गोड आठवणी, लहानपणाची धमाल,बालदिनानिमित्त प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी शेअर केल्या आठवणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.