अमृताने घेतले नवे घर, दाखवली झलक
2024 वर्षात दमदार प्रोजेक्ट सोबत अमृता अनेक गोष्टीमुळे चर्चेत आहे. सोबतीला अनेक नवनवीन भूमिका मधून ती प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. ऐन दिवाळीत अमृताची स्वप्नपूर्ती झाली आहे ! सोशल मीडियावर अमृता नेहमीच सक्रिय असते आणि आता तिने आपल्या स्वप्नपूर्तीची झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. एका सुंदर व्हिडिओद्वारे तिने नव्या घराची एक झलक आपल्या चाहत्यांना दाखवली आहे.
अमृताने सोशल मीडिया वर एक खूप खास गोष्ट शेयर केली असून प्रेक्षकांना ही गोड बातमी दिली आहे. मुंबईत स्वतःच अस एक घर घेण्याचं अमृताच स्वप्न पूर्ण झालं असून अमृताने तिच्या नव्या घराची खास झलक प्रेक्षकांना दिली आहे. तिने या खास घराला एक गोड नाव देखील दिलं आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
काय म्हणाली अमृता
या खास क्षणाबद्दल बोलताना अमृता म्हणते ” स्वप्नांच्या या शहरात घर विकत घेणं हे खरंच एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं वाटतंय. आज माझ्या वाढदिवसाच्या महिन्याच्या सुरुवातीला आणि लक्ष्मी पूजेच्या या शुभवेळेत मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लक्ष्मीचं स्वागत करते “माझ्या गृहलक्ष्मी, माझ्या आईसह” नेहमीच मला एक असं स्वतःचं घर हवं होतं, जे माझ्या मेहनतीनं आणि प्रेमानं तयार झालेलं असावं. माझ्या कुटुंबासाठी, मित्र -मैत्रिणी आणि निर्वाण व नूर्वीसाठी. एक असं घर, जिथं आम्ही सगळे एकत्र येऊ शकतो, अनेक खास क्षण साजरे करू शकतो, आणि जीवनातील सुंदर क्षण अनुभवू शकतो.
मुंबईत घर घेणं हे खूपच स्वप्नवत् वाटतंय. २२व्या मजल्यावर असलेलं हे माझं छोटंसं ३ बीएचके विश्व, मी त्याला “एकम” असं नाव दिलंय आणि नवीन सुरूवात करून आरंभ केला आहे”
अमृताचा बर्थडे मंथ
गंमत म्हणजे दिवाळीच्या खास मुहूर्ताच्या सोबतीने अमृताच्या बर्थडे महिन्याची सुरुवात देखील झाली आहे त्यामुळे हा खास योगायोग जुळून आला आहे. फॅशन असो किंवा वैविध्यपूर्ण भूमिका नेहमीच चोख पार पाडून अमृताने प्रेक्षकांना मोहित केलं आहे आणि 2024 वर्ष तिने खास केलं आहे. येणाऱ्या काळात अमृता अनेक नवनवीन हिंदी – मराठी प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे. प्रेक्षकांना मोहित करणारी अमृता स्वप्न बघून ती सत्यात उतरवण्यासाठी देखील तेवढेच कष्ट करते
नव्या घराच्या डेकोरेशनची उत्सुकता
अमृताचं नृत्यावर खूपच प्रेम आहे, तर अभिनयातही तिने अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत. आता तिच्या घराचे डेकोरेशन ती तिच्या या दोन्ही आवडीनुसार नक्की कसे करणार याचीही चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. अमृताचा साधेपणा आणि मॉडर्नपणा या दोघांच्याही तिचे चाहते प्रेमात आहेत. तर त्यानुसार तिच्या घराचे डेकोरेशन नक्की कसे असणार याचीही नक्कीच उत्सुकता आता लागून राहिली आहे.
हेदेखील वाचा – अमृता खानविलकरच “वर्ल्ड ऑफ स्त्री” मधून भव्य नाट्यपदार्पण !
अमृताच्या घराची झलक