अमृता खानविलकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे लुक हे अत्यंत स्टायलिश आणि ग्लॅमरस असतात. तर कधी पारंपरिक आणि आधुनिकतेचा उत्तम संगमही असतो. नुकताच अमृताने ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅम लुक शेअर केला असून चाहत्यांना क्लिन बोल्ड केले आहे. तिच्या सौंदर्याने चाहत्यांचे हृदय चोरले आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. अमृताचा हा क्लासी आणि ग्लॅमरस लुक नक्की कसा आहे हे आपण या लेखातून डिकोड करूया. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अमृता खानविलकर कोणत्याही ड्रेसमध्ये क्लासी आणि स्टायलिश दिसते आणि फॅशन उत्तम कॅरी करते. आताही तिने डार्क ब्लू ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत
ऑफशोल्डर आणि थाय हाईट स्लिट असणाऱ्या या फिगर फिटेड ड्रेसमध्ये अमृता कमालीची सुंदर दिसत असून तिची स्टाईल खूपच हायफाय दिसून येत आहे आणि अमृताच्या Attitude ने त्यावर चारचाँद लावले आहेत
अमृताने खुर्चीत बसून पोझ दिली आहे आणि हातात मॅचिंग हाय हिल्स घेतले आहेत. तिची ही पोझ खूपच क्लासी दिसून येत आहे. तर ड्रेससह तिचे शूजही परफेक्ट मॅच झालेत
अमृताने हेअरस्टाईल करताना पुढचे केस कपाळावर थोडे पुढे घेतले आहेत आणि बाकी केस टाय करत तिने या ड्रेससह मॅच होईल अशी हेअरस्टाईल कॅरी केली आहे. तिची ही मेस्सी बन हेअरस्टाईल खूपच सुंदर दिसतेय
अमृताने या ड्रेससह मिनिमल दागिने घातले असून तिने गोल्डन आणि हिऱ्यांचे खडे असणारे असे स्टायलिश कानातले घातले आहेत आणि त्यासह हातात स्टार डिझाईन्ड गोल्डन आणि मॅचिंग खड्यांचे ब्रेसलेट कॅरी केले आहे
तसंच आपल्या नखांना सुंदर शेप देत एक वेगळाच नेलपेंटचा कलर तिने यावेळी वापरला आहे. वास्तविक तिची नखं ही या स्टाईलसह चांगलीच मॅच होत आहेत आणि स्टायलिश दिसत आहेत
अमृताने यासह मिनिमल मेकअप केला असून मॅट मेकअपचा आधार घेतलाय. बेसिक फाऊंडेशन, आयशॅडो, हायलायटर, ब्लॅक कोहल, काजळ, डार्क आयब्रो आणि न्यूड ब्राऊन लिपस्टिक शेड लावत तिने हा लुक पूर्ण केलाय