'चंद्रमुखी'च्या निस्सिम सौंदर्याचं नेमकं रहस्य काय ? अमृता खानविलकरने शेअर केला खास व्हिडिओ...
महाराष्ट्रातल्या घराघरांत ‘चंद्रमुखी’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या अमृता खानविलकरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनय आणि लावणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात अमृता प्रसिद्ध झाली आहे. शिवाय अमृताने आपल्या चाहत्यांच्या मनावर सौंदर्याच्या माध्यमातूनही अधिराज्य गाजवले आहे. कायमच अभिनय आणि लावणीमुळे चर्चेत राहणारी अमृता सध्या तिच्या निखळ सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दरम्यान, अमृताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत तिच्या स्किन केअर रूटीनचा फंडा चाहत्यांना सांगितला आहे.
मिस्टर अँड मिसेस भगत ‘शिवतीर्था’वर, अंकिता वालावलकरने पतीसोबत दिलं राज ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण
अमृता कायमच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्याबद्दल, तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल शिवाय तिचे ब्यूटी सिक्रेट फंडाही चाहत्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यासोबतच ती अनेकदा स्वत:चे वेगवेगळ्या लूकमधले फोटो आणि व्हिडिओेही इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. खरंतर अमृता स्वत:च्या फिटनेसची विशेष काळजी घेते. शिवाय ती स्वत:च्या सौंदर्यावरही प्रामुख्याने लक्ष देते. अशातच अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिचे वर्कआउटनंतरचे स्किन केअर रूटीन सांगितले आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अमृता म्हणते, “नमस्कार, वर्कआउटनंतरच्या माझ्या स्किन केअर रूटीनच्या या व्हिडीओमध्ये तुमचं स्वागत. सर्वांत आधी मी एक्सफ़ोलिएटिंग जेल चेहऱ्यावर लावते. हे जेल अत्यंत सॉफ्ट आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेला कोणताही त्रास होत नाही. त्यानंतर मी रेमी लॉर क्लिन्सिंग टोनर चेहऱ्यावर लावते. अनेक वर्षांपासून मी हे अतिशय सुंदर टोनर वापरत आहे. आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये टोनर फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर थंड पाण्यानं मी चेहरा धुऊन घेते. ”
सुप्रसिद्ध लावणीकिंग आशिष पाटीलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय ?
अमृता स्किन केअर रुटिनबद्दल सांगताना, कृपया गरम पाण्याने चेहरा धुऊ नका. कारण, ते त्वचेसाठी अजिबात चांगलं नसल्याचं तिने चाहत्यांना सांगितलं आहे. स्किनकेअर रूटीनमध्ये तिनं शेवटी ओठांवर एक लिप बाम लावला आहे. दरम्यान, अभिनेत्री हे स्किन रुटिन शुटिंग वैगेरे अशा अनेक गोष्टींमुळे केलेले आहे. स्किन केअर रुटीनचा हा व्हिडीओ शेअर करताना अमृताने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “वर्कआउटनंतर स्किनकेअर रूटीन करणे आवश्यक आहे. कारण, वर्कआउटमुळे आनंदी हार्मोन्स रिलीज होत असले तरीही ते तुमच्या त्वचेवरील छिद्रेदेखील बंद करतात. म्हणून वर्कआउटनंतर माझं स्किनकेअर रूटीन काय आहे ते मी शेअर करत आहे.” तिने पुढे व्हिडिओमध्ये कोणकोणते स्किनकेअर प्रॉडक्ट्स वापरले आहेत. याबद्दलही माहिती चाहत्यांना दिली आहे.