Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

लोकप्रिय अभिनेत्री रिंकु राजगुरू हिने अलिकडेच एका मुलाखतीत तिच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दल सांगितले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 15, 2026 | 07:18 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकु राजगुरू हिने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. ती गेली दहा वर्ष सिनेइंडस्ट्रीत काम करत आहे. सैराट चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटात काम केलं आहे. तिने उत्तम अभिनयशैली आणि सोज्वळपणा यामुळे प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे. रिंकु सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती सतत मीडियावर तिचे स्टायलिश फोटो – व्हिडिओ शेअर करताना दिसते.

अलिकडेच एका मुलाखतीत तिने ती आधी नास्तिक असल्याचे कबूल केले आहे.तसंच काही घटनांमुळे ती अध्यात्माकडे वळली असल्याचंसुद्धा तिने सांगितले आहे. याचबरोबर तिने केदारनाथचा अनुभव देखील शेअर केला आहे.

अलिकडेच रिंकु राजगुरूने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ” मी आधी देवावर विश्वास ठेवत नव्हते.मी नास्तिक होते. केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा देवावर विश्वास बसायला लागला. मग मी उपवास करत गेले आणि मला त्याचे अनुभवही आले. खरंतर मी आता त्या गोष्टींकडे खूप वळले आहे. पूजा – पाठ, मंत्र, सण- उत्सव यामागे वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत. पण या सगळ्याबरोबर अशी कोणती तरी शक्ती आहे. जेव्हा त्याची इच्छा असते, तेव्हाच आपण त्या गोष्टी करतो किंवा मानायला सुरूवात करतो.माझ्याबाबतीतही तेच झालं. माझ्या आयुष्याच अशा काही घटना घडल्या आणि मग मी या गोष्टी करायाला सुरूवात केली. मला असं वाटलं की आता इथेच एक ती आशा आहे आणि शांतता आहे. मला घरात सकाळी देवपूजा, जप करायला आवडचे. त्यामुळे मी ते स्वत:साठी करते. ”

पुढे रिंकूने तिला केदारनाथमध्ये कोणता अनुभव आला हे सांगितले, ती म्हणाली, ”माझा अनुभव हा कधीच विसरू शकत नाही. मला अचानक वाटलं की, मला केदारनाथला जायचं आणि मी गेली सुद्धा. गुरूवारी पौर्णिमेच्या दिवशी चालत केदारनाथला गेले होते. खूप थकले आणि पायही दुखत होते. मी दर्शन घेतले आणि मला त्यावेळी असं वाटलं की जातान मला निदान हेलिकॉप्टर तरी मिळावे, कारण पुढच्या दिवशी माझी फ्लाइट होती. आम्हाला एका माणसाने सांगितले हेलिकॉप्टर मिळेल, आम्ही दोन तीन तास थांबलो, वाट बघून बघून अंधार झाला आणि मी तेव्हा देवाला म्हणाले की, मला हेलिकॉप्टर मिळूदेत. मी माझं कुटुंबासह दर्शनाला येईल.”

Bigg Boss Marathi 6 : कुणाला गुलाब तर कुणाला काटे! “हे तुम्ही कुणाला आणलंत बिग बॉस…” राखी आणि प्राजक्तामध्ये झाला राडा

रिंकूने पुढे सांगितले, नंतर एक माणूस आला आणि म्हणाला हेलिकॉप्टर मिळणार नाही. तेव्हा मी खूप रडत होते. चिडले, त्या त्रासात देवाला म्हणाले हा काय देव आहे.. काय ऐकतोय का… हेलिकॉप्टर हवं होते पण तेही करत नाहीय.. असं बोलत पुढे जाच होते, तेव्हा मागून एक माणूस आला आणि त्याने हेलिकॉप्टरबद्दल विचारले. त्याने सांगितले दोनच सीट आहेत.त्यावेळी मी आनंदाच्या भरात जोरात पळत पळत गेले आहे पडले. माझ्या गुडघ्याला लागलं. त्यानंतर मी देवाला म्हणाले की मी आता इथून पुढे कधीच तक्रार करणार नाही, कारण मला तिथल्या तिथेच शिक्षा मिळाली.”

‘Heer Ranjha’ची स्टारकास्ट ठरली? रांझाच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता, Imtiaz Ali–Ekta Kapoor यांचा चित्रपट चर्चेत

Web Title: Rinku rajguru shares her kedarnath experience says in my life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • Kedarnath
  • marathi actress
  • rinku rajguru

संबंधित बातम्या

Prajakta Mali : चाहत्याने केला प्रश्न “प्राजक्ता, तू लग्न कधी करणार?” अखेर अभिनेत्रीने उत्तर दिलेच
1

Prajakta Mali : चाहत्याने केला प्रश्न “प्राजक्ता, तू लग्न कधी करणार?” अखेर अभिनेत्रीने उत्तर दिलेच

“कपड्यावरुन तुम्ही मुलींना जज करणार” ? ‘या’ मराठी अभिनेत्रीने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली आम्ही सगळ्या कमेंटस्….
2

“कपड्यावरुन तुम्ही मुलींना जज करणार” ? ‘या’ मराठी अभिनेत्रीने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली आम्ही सगळ्या कमेंटस्….

मराठी अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, युवा उद्योजकाशी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो
3

मराठी अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, युवा उद्योजकाशी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.