bigg boss marathi ankita prabhu walawalkar invite to raj thackeray for wedding
सोशल मीडिया एन्फ्लूएंसर आणि बिग बॉस मराठी ५ फेम अंकिता वालावलकर सध्या तिच्या लग्नामुळे जबरदस्त चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अंकिता आणि तिचा होणारा पती कुणालच्या घरी लग्नाच्या आधीच्या विधींना सुरु झाली आहे. नुकतंच अंकिताच्या घरच्यांनीही तिचं आणि कुणालचं पहिलं केळवण केलं. आता लवकरच अंकिता लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या अंकिता लग्नपत्रिका वाटताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिने काही कलाकारांनीही आपल्या लग्नाची पत्रिका दिली. त्यांनंतर आता अंकिताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण दिलं. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सुप्रसिद्ध लावणीकिंग आशिष पाटीलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय ?
अंकिता वालावलकरने सर्वात आधी लग्नाची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच दिली होती. एका व्हिडीओमध्ये तिने सांगितलं होतं की, “तुम्ही सर्वांनी माझा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास पाहिला आहे. मी खूपच जास्त भावनिक मुलगी आहे. जेव्हा आमचं लग्न ठरत होतं, तेव्हा एक गोष्ट तुम्हाला सांगते, आमच्या दोघांचे अनेक गुण जुळत होते, त्यापैकीच एक गुण जुळला तो म्हणजे आमच्या भावना. त्या भावनांपैकी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माननीय राज ठाकरे. जेव्हा ‘येक नंबर’चित्रपटाचं काम चालू होतं आणि कुणाल या चित्रपटासाठी काम करत होता. तेव्हा मला खूपच आनंद झाला होता. यादरम्यानच आम्ही राज ठाकरेंना सगळ्यात आधी आमच्या लग्नाची बातमी सांगितली होती. राज साहेबांना आम्ही गुढीपाडव्यालाच लग्नाबद्दल सांगितलं होतं. पण, त्यानंतर ‘बिग बॉस’मुळे सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या.”
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अंकिताने चाहत्यांना कुणालचा चेहरा दाखवत रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी अंकिताच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सध्या अंकिता पत्रिका वाटताना दिसत आहे. नुकतंच अंकिता आणि तिचा होणारा पती कुणाल भगत दोघेही राज ठाकरेंचं निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर गेले होती. यावेळी त्यांना लग्नाची पत्रिका देत राज यांना लग्नाचं निमंत्रण दिलं. अंकिताने निमंत्रण देतानाचा फोटो इन्स्टास्टोरीला शेअर केला होता. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये राज ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील पाहायला मिळत आहे.
दोन घटस्फोटानंतर आमिर खान पुन्हा तिसऱ्यांदा पडला प्रेमात ? कुटुंबासोबतही दिली करुन ओळख; कोण आहे ती?
अंकिता वालावलकरच्या लग्नाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. परंतू अद्याप चाहत्यांना तिच्या लग्नाची तारीख चाहत्यांना माहिती नाही. मीडिया रिपोर्टनुसार, अंकिता अंकिता मार्च महिन्यामध्ये कुणालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अंकिताचा होणारा पती कुणाल संगीतकार आहे. बऱ्याच चित्रपटातील गाणी आणि मालिकांचं शीर्षकगीत त्याने संगीतबद्ध केलं आहे.