Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निळू फुलेंच्या लेकीची मालिकाविश्वातून तडकाफडकी निवृत्ती, कारण सांगत केला खुलासा

आपल्या गोड अभिनयाने सर्वांनाच आपलंसं करणाऱ्या गार्गी फुलेने मालिकाविश्वातून रिटायरमेंट घेतल्याचे मुलाखतीतून स्पष्ट केले आहे. काही मोजक्याच मराठी मालिका आणि मराठी चित्रपटांत काम केल्यानंतर अभिनेत्रीने हा निर्णय घेतला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 03, 2025 | 04:00 PM
निळू फुलेंच्या लेकीने इंडस्ट्रीतलं सांगितलं कटू सत्य, म्हणाली, "सिनेसृष्टीत रील स्टार येतो आणि…"

निळू फुलेंच्या लेकीने इंडस्ट्रीतलं सांगितलं कटू सत्य, म्हणाली, "सिनेसृष्टीत रील स्टार येतो आणि…"

Follow Us
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची लेकही मराठी फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. त्यांनी मराठी सिनेसृष्टीमध्ये काही निवडक प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्रीने तिच्या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधलेय. आपल्या गोड अभिनयाने सर्वांनाच आपलंसं करणाऱ्या गार्गी फुलेने मालिकाविश्वातून रिटायरमेंट घेतल्याचे मुलाखतीतून स्पष्ट केले आहे. काही मोजक्याच मराठी मालिका आणि मराठी चित्रपटांत काम केल्यानंतर अभिनेत्रीने हा निर्णय घेतला आहे.

‘काही कळेना मला’प्रेमगीताची सोशल मीडियावर चर्चा, प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवणारं गाणं तुम्ही ऐकलंत का ?

‘लेट्सअप मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री गार्गी फुले यांनी सांगितले की, “खरं सांगायचं तर मी, मालिकाविश्वातून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे. कारण मी मालिकाविश्वात १० वर्षे काम केलं आहे. माझं कुटुंब पुण्यात आहे. मी १० वर्षे कुटुंबापासून खूप लांब राहिले. खरं सांगायचं तर, कलाकारांसाठी मालिकेचं शेड्युल खूप विचित्र झालं आहे. मालिकेमध्ये काम करण्याची जर तुमच्यात आवड असेल तरच तुम्ही मराठी मालिकाविश्वात काम करावं. बाकीच्या दृष्टीने आरोग्यच्या असो किंवा इतर, तर खूप त्रास होतो.” अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं शूटिंग पूर्ण, तीन भाऊ पुन्हा कल्ला करणार; चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

दरम्यान गार्गी फुले यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’मालिकेतून गार्गी यांना महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्धी मिळाली आहे. मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर ही भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर गार्गी ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘इंद्रायणी’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’या लोकप्रिय मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. याशिवाय त्यांनी काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. चित्रपटाबद्दल बोलायचं तर, त्यांनी ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ चित्रपटातही काम केलं आहे. पण आता मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

Sankranthiki Vasthunam चित्रपटाचा जबरदस्त व्हिडिओ रिलीज, व्हिज्युअल्स आणि व्हॉइस ओव्हरने केले थक्क!

गार्गी फुले यांच्याबद्दल सांगायचे तर, गार्गी फुले अभिनयाशिवाय राजकारणातही सक्रिय आहेत. तसंच आता त्यांनी व्यवसाय क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. गार्गी यांनी स्वतःचं Solitude Holiday नावाचं ट्रॅव्हलिंग अ‍ॅपही लॉंच केलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आवडत्या कलाकारांसोबत चाहत्यांना देश-विदेशात फिरायला मिळणार आहे.

Web Title: Actress gargi phule revealed she has taken retirement from television serials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • marathi actress
  • Television Actress

संबंधित बातम्या

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच…’;अभिनेत्रीने सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ
1

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच…’;अभिनेत्रीने सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ

Marathi Natak: रंगभूमीवर दोन नाटकांचा डंका! ‘जर तर ची गोष्ट’ ४००व्या, तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ ५०व्या प्रयोगासाठी सज्ज
2

Marathi Natak: रंगभूमीवर दोन नाटकांचा डंका! ‘जर तर ची गोष्ट’ ४००व्या, तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ ५०व्या प्रयोगासाठी सज्ज

Sai Godbole: अभिनेत्री किशोरी गोडबोलेंच्या लेकीची कमाल! सई गोडबोले बनली इंटरनॅशनल ब्रँडचा नवा चेहरा, आईचा आनंद गगनात मावेना
3

Sai Godbole: अभिनेत्री किशोरी गोडबोलेंच्या लेकीची कमाल! सई गोडबोले बनली इंटरनॅशनल ब्रँडचा नवा चेहरा, आईचा आनंद गगनात मावेना

Smita Tambe Movie: शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, नात्यांची गुंतागुंत अन् राजकारणाचं वास्तव; ‘धडपड’च्या चित्रीकरणाला सुरुवात
4

Smita Tambe Movie: शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, नात्यांची गुंतागुंत अन् राजकारणाचं वास्तव; ‘धडपड’च्या चित्रीकरणाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.