पूजा सावंतने स्वामी समर्थांना लिहिलं भावनिक मुद्द्यावर पत्र; अभिनेत्री नेमकं पत्रात काय म्हणाली ?
आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात पत्र लिहिणं दुर्मीळ झालं आहे. मात्र, कोणाला पत्र लिहिणं हा विषय अतिशय भावनिक असतो. अभिनेत्री पूजा सावंतने स्वामी समर्थांना पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाच्या निमित्तानं पूजाने स्वत: पत्र लिहिलं आहे. अभिनेत्रीने पत्र लिहितानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
आदित्य पांचोलीचं खरं नाव काय ? चित्रपटामुळे नाही तर वादामुळेच चर्चेत; वाचा बॉलिवूड प्रवास…
पूजा स्वतः स्वामीभक्त असल्याने पूजाने अत्यंत तळमळीनं स्वामींना पत्र लिहिलं आहे. त्यात पूजानं स्वतःसाठी काहीही न मागता अतिशय भावनिक मुद्दा मांडला आहे. मुक्या प्राण्यांची मदत करण्याची बुद्धी सर्वांना मिळावी, भूतदयेच्या कामात कधीही कमी पडणार नाही इतकं सक्षम करा, माझा पत्ता जरी सध्या बदललेला असला तरी मन मोकळ करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवण्याचा पत्ता मला मिळाला आहे अशी भावना पूजानं पत्रात व्यक्त आहे. त्यामुळे या पत्रातून पूजाचं प्राणीप्रेमही दिसून येत आहे.
‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’च्या नावावर आणखी एक मोठे यश, गोल्डन ग्लोबनंतर या यादीत चित्रपटाचा समावेश!
व्हिडिओ शेअर केलेल्या पत्रात अभिनेत्री म्हणाली,
“प्रिय स्वामी, परवा सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. देवाकडे फेसबूक नाही, इन्स्टाग्राम नाही, पण स्वत:चा पत्ता आहे. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ खरंच किती दिवस झालेत ना कोणाला पत्र लिहून. म्हणून आज तुम्हालाच थेट पत्र लिहितेय. आज मी माझ्यासाठी काहीही मागणार नाहीये. पण तुमच्या दत्त अवतारातील तुमच्या पायाशी जे चौघे उभेत ना… मी त्यांच्यासाठी मागणार आहे. स्वामी या जगात कुठलाही मुका प्राणी एखाद्या संकटात असेल ना तेव्हा आपल्यातला कोणीतरी व्यक्ती त्यांचा देव म्हणून त्यांच्या मदतीला धावून जाईल आणि त्या मुक्क्या प्राण्याला मदत करेल. ही बुद्धी देव जगातल्या सगळ्यांना देवो, हिच माझी विनंती… तसंच मला देव इतकं सक्षम बनवू दे की मी या भूतदयेच्या कामात केव्हाही कमी पडायला नाही पाहिजे. बाकी सगळं ठिक आहे. सध्या माझा पत्ता बदललाय. पण मी जगातल्या कोणत्याही भागात असो… पण मी मन मोकळं करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी मला तुमचा पत्ता सापडला आहे. स्वामी लक्ष असू द्या… तुमचीच पूजा… ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट, जिल्हा- सोलापूर…”
Sonu Sood: ‘इथे पार्ट्यांमध्ये चांगला अभिनय केला जातो’; सोनू सूदने बॉलिवूडचा केला पर्दाफाश!
मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार – महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.