(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सध्या अभिनेता सोनू सूद त्याच्या ‘फतेह’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. नुकत्याच Mashable India ला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने बॉलिवूड पार्ट्यांचे काही रहस्यही उघड केले. या पार्ट्यांमध्ये जाणे अभिनेत्याला आवडत नाही. तो कधीच कोणत्या बॉलीवूड पार्टीमध्ये सहभागी होताना देखील दिसत नाही. तसेच अभिनेत्याचा ‘फतेह’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने बॉलीवूड मधील अनेक रहस्य उघड केले आहे. पार्टीमध्ये जाण्यास अभिनेत्याला का आवडत नाही त्याने उत्तर त्याने दिले आहे.
2025 मध्ये हॉरर-कॉमेडी चित्रपट घालणार धुमाकूळ; जाणून घ्या कोणता चित्रपट कधी होणार प्रदर्शित!
मला पार्टीमधून काम मिळत नाही
मुलाखतीत सोनू सूदला बॉलीवूड पार्ट्यांबद्दल काय वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला की, ‘माझ्या कॅमेऱ्यासमोर काम करणे जास्त महत्वाचे आहे, कोणाच्या घरी किंवा पार्टीत जाऊन मी प्रयत्न का करू. पार्टी केल्याने करिअर घडत नाही. बॉलीवूड पार्टीला जाऊन अनेकांचे करिअर घडले असतील, परंतु मला पार्टीला जाणे आवडत नाही. तसेच, मी मद्यपान करत नाही, धूम्रपान करत नाही, म्ह्णून पार्ट्यांना जात नाही. मला या पार्ट्यांमध्ये हरवल्यासारखे वाटते.’ असे अभिनेत्याने या मुलाखतीत सांगितले.
ढोंग करू शकत नाही
या मुलाखतीत सोनू पुढे म्हणतो, ‘मी नसलेली व्यक्ती असल्याचे भासवू शकत नाही. मला अनेक बॉलीवूड पार्ट्या खोट्या वाटतात. या पार्ट्यांमध्ये अनेक जण कॅमेऱ्यापेक्षा चांगला अभिनय करतात. असे केल्याने त्यांना काही प्रकारचे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे.’ असे अभिनेत्याने स्पष्ट केले.
‘फतेह’ नंतर दक्षिणेत काम करणार अभिनेता
बॉलिवूड व्यतिरिक्त सोनू सूदने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे, अभिनेत्याचे तिथे मोठे नाव आहे. सोनू सूदने मुलाखतीत सांगितले की, ‘दक्षिणेतील काही चाहत्यांनी त्याचे मंदिर बांधले आहे. साऊथचे प्रेक्षक सोनू सूदला आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात. सोनू सूदला भविष्यातही साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे.’ असे त्याने म्हंटले आहे. सध्या त्याला आपले संपूर्ण लक्ष ‘फतेह’ चित्रपटावर केंद्रित करायचे आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘फतेह’ चित्रपटातील जॅकलिनच्या सिंपल लूकचे खूप कौतुक होत आहे.