सध्या सिनेसृष्टीत लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. नुकतचं अभिनेता अजिंक्य ननावरे अभिनेत्री शिवानी सुर्वे लग्नबंधनात अडकले. व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर अभिनेता प्रथमेशनं (Prathamesh Parab) गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत (kshitija ghosalkar) साखरपुडा केला. आता मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री पूजा सांवत (Pooja Sawant) सिद्देश चव्हाणसोबत (Siddesh Chavan) लग्नानाच्या बेडीत अडकण्यास सज्ज झाली आहे. साखरपुड्यानंतर आता पुजाच्या मेंहदी सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांसह सेलेब्रिटीही तिला शुभेच्छा देताना दिसत आहे.
[read_also content=”‘वेळ खरोखरच उडून जातो…’ प्रियंका चोप्रानं लेकीचा फोटो शेअर करत केला प्रेमाचा वर्षाव! https://www.navarashtra.com/movies/priyanka-chopra-gets-nostalgic-as-she-shares-then-and-now-pics-of-daughter-malti-marie-chopra-jonas-nrps-510835.html”]
अभिनेत्री पुजा सावंत सिद्धेश चव्हाणसोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. पुजाच्या घरी तिच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. साखरपुडा आणि संगीत सोहळ्यानंतर सोमवारी तिचा मेहेंदी कार्यक्रम सोहळा रंगला.आता पूजाच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. पुजाच्या हातावर सिद्धेशच्या नावाची मेहेंदी रंगली आहे.
मेहेंदी सोहळ्यासाठी पूजाने खास सप्तरंगी लेहेंगा परिधान केला होता. खड्यांची ज्वेलरी घालून आणि केस मोकळे सोडत पूजाने ग्लॅमरस लूक केला होता. तिच्या मेहेंदी सोहळ्याला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पूजा आता लवकरच सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.