
sonalee kulkarni
लॉकडाऊनमध्ये रजिस्टर मॅरेज केल्यानंतर गेल्या वर्षी सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) कुणाल बेनोडेकरसोबत (Kunal Benodkar) लंडनमध्ये धुमधडाक्यात लग्न केले. आता नुकतीच सोनाली कुलकर्णीने ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ (Patla Tar Ghya With Jayanti) या टॉकशोमध्ये एक गुड न्यूज दिली आहे. सोनाली कोणाला तरी फोन करून ‘आता नाही येऊ शकत, कारण गुड न्यूज आहे’ असं सांगत आहे. त्यामुळे आता सोनालीच्या घरातही पाळणा हलणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. आता ही गुडन्यूज काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना येत्या शुक्रवारपर्यंत वाट पाहावी लागेल.
य शोमध्ये सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले. सोनाली कुलकर्णी आणि तिच्यामध्ये लोकांचा कसा गोंधळ व्हायचा, याचाही धमाल किस्सा तिने यावेळी सांगितला. तिच्या आवाजावरून तिला अनेकदा नाकारण्यात आले, हेसुद्धा तिने यावेळी सांगितले. हा एपिसोड प्रेक्षकांना शुक्रवारी प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.