Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

नगर शहरात अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघातांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. यामुळेच प्रेरणा प्रतिष्ठानने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 15, 2026 | 08:57 PM
शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • नगर शहरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होतेय
  • शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी
  • चक्का जाम आंदोलन करण्याचा प्रेरणा प्रतिष्ठानचा इशारा
अहिल्यानगर शहरातून अवजड वाहतूक होत असल्यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत. त्यात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. शनिवारी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात बळी पडलेल्या आशिष काळे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करावी, तसेच .शहरातून जाणारी अवजड वाहतूक त्वरित बंद करावी, सीसीटीव्ही कॅमेरे उड्डाणपुलावर लावावावेत, अन्यथा प्रेरणा प्रतिष्ठान शहरात उम्र चक्का जाम आंदोलन करेल, असा इशारा प्रतिष्ठानच्या वतीने वैभव ढाकणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयास निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरेश बनसोडे, गोरख पडोळे, प्रा. माणिक विधाते, शिवाजी डोके, मंगेश खताळ, संतोष ढाकणे, अवधूत फुलसुंदर यांच्यासह मोठ्या संख्यने युवक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की याअगोदरही पोलिस प्रशासनाकडे वेळोवेळी अवजड वाहतुकीबाबतीत तक्रारी केल्या असून, अद्याप कोणतीही कठोर कारवाई होत नाहीये. शहर परिसरात विशेषतः उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे.

Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना नाही

अहिल्यानगर शहर परिसरात कायम अवजड वाहनांची वाहतूक होताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना रस्त्यावर वाहने चालवताना कायम अडथळे येतात व या अवजड वाहतुकीमुळेच बरेच अपघात झाले आहेत. विविध पोलिस ठाण्यामध्ये अपघाताच्या नोंदी आहेत. सदरच्या अपघातांमध्ये निष्पाप लोकांचा जीव जाण्याच्या घटना याआधीही घडलेल्या आहेत. त्याबाबत आम्ही स्वतः व राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेतर्फे तक्रारी अर्ज देऊनही अवजड वाहतूक थांबलेले दिसून येत नाही.

तुम्हाला जबाबदार धरू

जड वाहनांची वाहतूक विशेषत। रात्री ८ ते सकाळी ८ यादरम्यान सर्रासपणे शहरातून होते. यातून होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असल्यास ही अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी. असे झाले नाही तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन करू, तसेच यानंतर होणाऱ्या प्रत्येक अपघाताला प्रशासनाला जवाबदार धरू.

उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली

कार्यवाही त्वरित व्हावी

काळे यांच्या अपघाताची व अवजड वाहतुकीला शहरात कायमची प्रवेशबंदी सात दिवसांत झाली नाही तर आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करू, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Ahilyanagar news prerana pratishthan demand to stop heavy traffic in the ahilyanagar city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ भागांना अवकाळी पावसाने जोरदार झोडपले, कांदा-गव्हाचे नुकसान
1

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ भागांना अवकाळी पावसाने जोरदार झोडपले, कांदा-गव्हाचे नुकसान

Ahilyanagar News: ‘या’ किरकोळ कारणावरून तमाशा कलावंतांचा विनयभंग! संगमनेर तालुक्यातील घटना; चौघांना अटक
2

Ahilyanagar News: ‘या’ किरकोळ कारणावरून तमाशा कलावंतांचा विनयभंग! संगमनेर तालुक्यातील घटना; चौघांना अटक

मंडणगडचा पारंपरिक उत्साह: धुत्रोलीत हनुमान जयंतीनिमित्त भव्य यात्रा व जंगी शक्ती-तुरा!
3

मंडणगडचा पारंपरिक उत्साह: धुत्रोलीत हनुमान जयंतीनिमित्त भव्य यात्रा व जंगी शक्ती-तुरा!

Budget Planning Tips : पगार येताच खिसा रिकामा होतोय? बचतीसाठी फॉलो करा सोप्या टिप्स
4

Budget Planning Tips : पगार येताच खिसा रिकामा होतोय? बचतीसाठी फॉलो करा सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.