
9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर (फोटो सौजन्य- pinterest)
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची भेट बिग बॉसमध्ये झाली आणि शो संपल्यानंतरही त्यांचे नाते कायम राहिले. २०२१ मध्ये भेटल्यानंतर ४ वर्षांपासून ते आजही एकत्र आहेत. सध्या हे जोडपे त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेजस्वी प्रकाश पुढील वर्षी तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत लग्न करू शकते, जो तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठा आहे. त्यांच्या लग्नाच्या अफवा बऱ्याच काळापासून समोर येत आहेत.
तेजस्वी प्रकाशने हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगच्या पॉडकास्टवर करण कुंद्रासोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या लग्नाच्या योजनांबद्दल उघडपणे सांगितले. तिने खुलासा केला की करणने बिग बॉस सोडताच तिला प्रपोज केले होते, परंतु अभिनेत्रीच्या आईची त्यांनी वेळ घ्यावा आणि एकमेकांना चांगले समजून घ्यावे अशी इच्छा होती. दोघेही अनेक वर्षांपासून Live In मध्येदेखील राहत असल्याचे सांगण्यात येते. नुकतेच तेजस्वीने बिझनेस क्षेत्रातही पाऊल टाकले असून तिने सलॉन सुरू केले आहे आणि तिच्या सलॉनची चांगलीच चर्चा झाली आहे.
तेजस्विनीने भारती आणि हर्षला सांगितले की, करण कुंद्राने बिग बॉस संपताच तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्याची आई आग्रह धरत होती की त्यांनी एकमेकांना वेळ द्यावा. तेजस्वी प्रकाश पुढे म्हणाली की, तिच्या आईने स्पष्ट केले होते की तिला करणवर विश्वास आहे, परंतु तिला तिच्या मुलीबद्दल खात्री हवी होती.
तिच्या प्रेमकथेबद्दल सविस्तर चर्चा करताना, अभिनेत्री म्हणाली की ती खूपच खोडकर आणि खेळकर आहे आणि जर कोणी तिच्यावर प्रेम करत असेल तर त्यांनी थेट तिच्याशी येऊन बोलले पाहिजे. बिग बॉसमधील तिच्या प्रवासाची आठवण करून देताना, तेजस्वी प्रकाश म्हणाली की करण कुंद्राने घरातल्या सर्वांना सांगितले होते की ती त्याला आवडते, पण तिला खात्री नव्हती.
तेजस्वीच्या मते, तिला वाटले की करणला फक्त तिच्यावर क्रश आहे, परंतु जेव्हा अभिनेत्याने वीकेंड का वारमध्ये सलमान खान आणि सर्व घरातील सदस्यांसमोर त्याचे प्रेम कबूल केले तेव्हा ती त्यावर विश्वास ठेवू लागली. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश बिग बॉस १५ मध्ये भेटले. त्यांची प्रेमकहाणी २०२१ मध्ये शोमध्ये सुरू झाली आणि आता ते पुढच्या वर्षी लग्न करू शकतात असे सध्या म्हटले जात आहे.