देशभक्तीनं ओतप्रोत भरलेला एक नाव कोरा ‘ए वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan Trailer ) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसापुर्वी या चित्रपटाचा टिझर लॅान्च करण्यात आला. ज्याला प्रेक्षकांनी चांगलीस पंसती दिली. आता या चित्रपटाचा ट्रेलर लॅान्च करण्यात आला आहे. या चित्रपटात सारा अली खान (Sara Ali Khan) देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 21 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
[read_also content=”अनंत- राधिकाच्या प्री वेडिंगच्या तिसऱ्या दिवशी नीता अंबानी यांचा खास परफॉर्मन्स, विश्वंभरी स्तुतीवर मंत्रमुग्ध करणारं नृत्य! https://www.navarashtra.com/movies/nita-ambani-dance-performance-at-anant-ambani-radhika-merchant-pre-wedding-funtion-nrps-512816.html”]
‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाची कथा 1942 च्या भारत छोडो आंदोलनाच्या अवतीभवती
फिरते. या आंदोनलात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उषा मेहता यांच्या योगदानाची कथा या चित्रपटात मांडण्यात आलीये. यामध्ये उषा मेहता यांची भूमिका सारा अली खान साकारणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उषा मेहता यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली. सर्वसामान्यापर्यंत आपला आवाज पोहोचावा यासाठी त्या रेडिओ स्टेशन सुरू करतात अंस ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यांच्या या संघर्षात त्यांच्या रेडिओ स्टेशनची महत्त्वाची भूमिका बजावताना दाखवण्यात आलं आहे.
या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी केली आहे. तसेच कन्नन अय्यर यांनी दिग्दर्शन केलंय. या चित्रपटाची कथा अय्यर आणि दरब फारुकी यांनी लिहिली आहे. यामध्ये सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे, तर इमरान हाश्मी, सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, ॲलेक्स ओ’नील आणि आनंद तिवारी हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. ‘ए वतन मेरे वतन’ 21 मार्च रोजी भारतासह 240 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही या चित्रपट भेटीला येणार आहे.