Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महात्मा फुले–सावित्रीबाईंच्या क्रांतीचा वारसा मोठ्या पडद्यावर; ‘भिडेवाडा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अशातच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे, ज्यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 04, 2026 | 03:34 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘भिडेवाडा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
  • प्राजक्ता गायकवाड साकारणार सावित्रीबाई फुले यांची भूमिका
  • महात्मा फुले–सावित्रीबाईंचा दिसणार प्रवास
 

ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने घेतले जाते. कारण ही वास्तू केवळ दगड–मातीची रचना नसून, ती आहे एका क्रांतीची साक्ष आहे. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी येथेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यामुळे ‘भिडेवाडा’ ही केवळ वास्तू न राहता, स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक संघर्षाची आणि परिवर्तनाची साक्षीदार ठरली आहे. हाच ऐतिहासिक ‘भिडेवाडा’ आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या वास्तूच्या प्रेरणादायी वारशातून जन्मलेली एका तरुणीच्या जिद्दीचा, स्वप्नांचा आणि संघर्षाचा प्रवास ‘भिडेवाडा’ या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. भूतकाळाच्या प्रेरणेतून वर्तमानाशी नाळ जोडणारी ही कथा समाजमनाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री घेणार दीपिका पादुकोणची जागा? ‘कल्कि 2898 AD’ मध्ये सुमतिच्या रोलसाठी जोरदार चर्चा

शिवमुद्रा स्टुडिओज निर्मित आणि राघो फिल्म प्रस्तुत ‘भिडेवाडा’ या सामाजिक चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवानी राजेशिर्के आणि अजित शिरोळे यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी जयश्री शिरोळे आणि कावेरी जावळे यांनी सांभाळली आहे. तर सुप्रिया शिंदे, वैभव जोशी आणि राजू विटकर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

 

या चित्रपटात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तर महात्मा जोतिराव फुले यांची भूमिका धीरेश जोशी यांनी साकारली आहे. या दोघांसोबत या चित्रपटात माधव अभ्यंकर, वैभव चव्हाण, ऋतुराज वानखेडे, नेहा सोनावणे, सम्राट शिरोळे, शरा गायकवाड, प्रदीप कोथमीरे, आनंद पिंपळकर, समद खान, प्रतिभा भगत, श्रीराम पेंडसे, निखिल निगडे, योगेश तनपुरे, पंकज चव्हाण आणि अनिरुद्ध देशपांडे हे मुख्य कलाकार झळकले आहेत.

‘धनुष माझ्या भावासारखा आहे…’, लग्नाच्या अफवांदरम्यान मृणालचे चकीत करणारे विधान; नेमकं सत्य काय? घ्या जाणून

या चित्रपटाची कथा अजित शिरोळे यांची असून पटकथा अजित शिरोळे अक्षय कट्टी यांची आहे. संवाद अक्षय कट्टी यांनी लिहिले आहेत गीते ईश्वर अंधारे यांनी लिहिली असून संगीत सागर शिंदे यांनी दिले आहे. संकलन राजेश बारबोले तर छायांकन योगेश कोळी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेश गोरे तर ध्वनी अशोक झुरुंगे यांचे आहे. कार्यकारी निर्माते अमित माझीरे आहेत. तसेच इतिहासाची साक्ष आणि वर्तमानाचा संघर्ष यांची सांगड घालणारा ‘भिडेवाडा’ हा चित्रपट सामाजिक जाणिवांना स्पर्श करणारा महत्त्वपूर्ण सिनेअनुभव ठरणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्यापही समोर आलेली नाही आहे.

Web Title: Prajakta gaikwad to play savitribai phule role in bhidewada movie poster viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • entertainment
  • mahatma phule
  • marathi movie

संबंधित बातम्या

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
1

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च
2

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता
3

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
4

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.