Spirit नंतर दीपिका पदुकोण 'या' बिग बजेट चित्रपटातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटी ऐकून निर्मातेही बुचकळ्यात
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री दिपीका पादुकोण चर्चेत आहे. ‘स्पिरिट’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडे ८ तासांच्या शिफ्टमुळे अभिनेत्री कमालीची चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या या मागणीमुळे अभिनेत्रीला दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी तिला थेट चित्रपटातून बाहेर काढले आहे. दीपिकाने दिग्दर्शकांकडे केलेल्या मागणीला त्यांनी विरोध केला आहे. अभिनेत्रीला जरीही या मागणीमुळे जरीही मोठा तोटा सहन करावा लागत असला तरीही तिला इंडस्ट्रीतून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तिच्या मागणीचे अनेक सेलिब्रिटींकडून कौतुक केले जात आहे. आता अशातच दीपिकाला आणखी एका चित्रपटातून बाहेर काढल्याची चर्चा आहे.
अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत भर गर्दीत घडली विचित्र घटना, पापाराझी म्हणाले- ‘भाऊ तुमची चैन…’
‘स्पिरिट’ चित्रपटानंतर आता दीपिकाला ‘कल्की २’ चित्रपटातूनही बाहेर काढण्यात आल्याची चर्चा होत आहे. अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बॉलिवूड मोबी नावाच्या इन्स्टाग्राम पापाराझी पेजने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिकाला आता ‘कल्की २’ चित्रपटातूनही काढण्याचा विचार केला जात आहे. ‘स्पिरिट’ चित्रपटानंतर अभिनेत्रीने ८ तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. ज्यावर दिग्दर्शकांनी आता विचार केला आहे. दीपिका पादुकोण ‘कल्की’चा एक महत्त्वाचा भाग होती, कथा तिच्या बळावर पुढे जाणार होती, अशा परिस्थितीत, जर अभिनेत्री सेटवर कमी वेळ देऊ इच्छित असेल तर निर्मात्यांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. जर दीपिका पादुकोण ‘कल्की २’साठी तिचा निश्चित वेळ देऊ शकली नाही तर तिला चित्रपट गमवावा लागू शकतो.
मल्याळम अभिनेता Shine Tom Chacko चा अपघात, वडिलांचा जागीच मृत्यू!
‘कल्की’च्या पहिल्या भागाच्या शूटिंगवेळी दीपिका प्रेग्नंट होती. तरीही तिने शूटिंग पूर्ण केलं होतं. मात्र आता तिच्या मागण्यांमुळे मेकर्सने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सप्टेंबर महिन्यात दीपिका पादुकोणने लेकीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर ती ‘स्पिरिट’ चित्रपटात दिसणार हे निश्चित झालं होतं. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित चित्रपटात काम करण्यासाठी दीपिकाने काही अटी ठेवल्या. आई झाल्यानंतर अभिनेत्रीने ८ तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. शिवाय, चित्रपटाच्या प्रॉफिट शेअरही मागितला होता. इतकंच नाही तर अभिनेत्रीने तब्बल २० कोटींच्या मानधनाची मागणी केली होती. या सर्व मागण्या वांगा यांना मान्य नव्हत्या म्हणून त्यांनी तिला सिनेमातून काढलं. आता तिच्या जागी तृप्ती डिमरीला घेण्यात आलं आहे. तृप्ती सिनेमासाठी ४ कोटी मानधन घेत आहे.