Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर, ‘या’ ज्येष्ठ कलाकारांचा होणार जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 07, 2025 | 11:47 AM
‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर, 'या' ज्येष्ठ कलाकारांचा होणार जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर, 'या' ज्येष्ठ कलाकारांचा होणार जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Follow Us
Close
Follow Us:

प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. ह्यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सदर ‘पुरस्कार वितरण समारंभ’ शनिवार, दिनांक १४ जून २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता यशवंत नाट्य मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई ४०००१६ येथे संपन्न होणार आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने ड्रायव्हरला चाकूने भोसकलं, नेमकं कारण काय ?

या सोहळ्यात “गंधर्व भूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रस्तुत, मराठी रंगभूमी,पुणे निर्मित…. गोविंदायन” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक नाटकातील प्रवेशांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमामध्ये निनाद जाधव, श्रद्धा सबनीस, वैभवी जोगळेकर, सुदीप सबनीस, चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर यांचा सहभाग असणार आहे.

हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उद्योगमंत्री तथा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

वडिलंच बनले शत्रू, एकता कपूरच्या सिंगल बनण्यामागील कारण काय ?

या सोहळ्यात व्यावसायिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार (नाटक : उर्मिलायन), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अद्वैत दादरकर (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे (नाटक : मास्टर माइंड), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार निषाद गोलांबरे (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार राजेश परब (नाटक : गोष्ट संयुक्त मानापमानाची), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक असेन मी नसेन मी (संस्था : स्क्रीप्टज क्रिएशन), सर्वोत्कृष्ट अभिनेता सुव्रत जोशी (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रशांत दामले (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हृषीकेश शेलार (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीना कुलकर्णी (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री शर्मिला शिंदे (नाटक : ज्याची त्याची लव स्टोरी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शुभांगी गोखले (नाटक : असेन मी नसेन मी) आणि अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार निहारिका राजदत्त (नाटक : उर्मिलायन), नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार श्री. सुशांत शेलार यांना प्रदान करण्यात येणार आहेत.

आईच्या मायेचा स्पर्श मनाला भावणारा आणि नात्याची गुंफण करणारं ‘तू नसशील तर’ गाणं रिलीज

तसेच नाट्यपरिषद- मुंबई कार्यकर्ता पुरस्कारासाठी महेश कापडोसकर, नाट्यपरिषद- शाखा कार्यकर्ता पुरस्कारासाठी सागर मेहेत्रे, सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी विक्रांत शिंदे, सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कारासाठी संतोष लिंबोरे (पाटील), गुणी रंगमंच कामगार सतीश काळबांडे, नाट्यसमीक्षक पुरस्कारासाठी अनिल पुरी, बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी मीनल कुलकर्णी, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी विजय नाट्य मंदिर, नाशिक, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कारासाठी अजय कासुर्डे, रंगभूमी व्यतिरिक्त केलेल्या विधायक कार्यासाठी विद्याधर निमकर, विष्णु मनोहर, प्रसाद कार्ले, सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कारासाठी डॉ. गणेश चंदनशिवे, भावेश कोटांगले, शाहिर राजेंद्र कांबळे, आसराम कसबे, कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी डॉ. चंद्रकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

पैशाने भरलेली बॅग कुठे ? ‘गाडी नंबर १७६०’ रहस्य आणि विनोदी टीझर रिलीज; लवकरच उलगडणार रहस्य

प्रायोगिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक संगीत आनंदमठ (संस्था : कल्पक ग्रुप, पुणे), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक मिडिआ (संस्था : रुद्रेश्वर, गोवा), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक दिग्दर्शक मुकुल ढेकळे (सं. नाटक : मून विदाऊट स्काय), सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार यशवंत चोपडे (सं. नाटक : ब्लँक इक्वेशन), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पूनम सरोदे (सं. नाटक : वेटलॉस) प्रायोगिक संगीत नाटक सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता अभिषेक काळे (सं. नाटक : संगीत अतृप्ता) प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री अनुष्का आपटे ( सं. नाटक : संगीत आनंदमठ), प्रायोगिक सर्वोत्कृष्ट नाटक लेखक डॉ. सोमनाथ सोनवळकर (सं. नाटक : द फिलिंग पॅरोडॉक्स) यांची निवड करण्यात आली.

‘इबलिस’ कार्टी करणार रुपेरी पडद्यावर कल्ला, चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष

तसेच नाट्य क्षेत्रातील व्यावसायिक / प्रायोगिक नाट्य निर्मात्यांना आणि नाट्य व्यवस्थापकांना सहकार्य केल्याबद्दल मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती वृषाली शेट्ये यांना आणि ५१ वर्ष प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अनुराग, कल्याण या संस्थेला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सदर सोहळा नाटय परिषदेच्या सर्व सभासदांस आणि रसिकांना प्रवेश विनामूल्य असून काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Akhil bharatiya marathi natya parishad award announced complete list of winner know best actor to best marathi play natak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
2

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
3

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
4

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.