Ekta Kapoor Did Not Marry Because Jeetendra Asked Either You Get Married Or Work
बॉलिवूड अभिनेता जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी एकता कपूर आहे. ह्या एकता कपूरची संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ‘टेलिव्हिजन क्वीन’ म्हणून ओळख आहे आणि याच ‘टेलिव्हिजन क्वीन’चा आज वाढदिवस आहे. आज एकता कपूर तिचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. 25 वर्षांपूर्वी ‘मानो या मानो’ या मालिकेतून टिव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकणाऱ्या एकता कपूरने इंडस्ट्रीला एकापेक्षा एक जबरदस्त मालिका दिल्या आहेत. एकताने तिच्या फिल्मी करियरमध्ये ‘पवित्र रिश्ता’, ‘कसम से’, ‘हम पांच’, ‘बडे अच्छे लगते हैं’ अशा अनेक प्रसिद्ध मालिकांची निर्मिती केली आहे. टिव्ही इंडस्ट्रीत एकता कपूर हे खूप मोठं नाव आहे. वयाच्या ५० व्या वर्षीही एकता कपूर सिंगलच आहे. नेमकी ती सिंगल का आहे ? तिच्या सिंगल राहण्यामागील नेमकं कारण आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया…
आईच्या मायेचा स्पर्श मनाला भावणारा आणि नात्याची गुंफण करणारं ‘तू नसशील तर’ गाणं रिलीज
एकताच्या सास-बहू ड्राम्यापासून ते रोमँटिक सीरियलपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडल्या. एकता कपूर सिंगल मदरचा आनंद घेत आहे. ती एका मुलाची आई आहे. सरोगसीच्या माध्यमातून एकता आई झाली. परंतु एकताने लग्न केले नाही. एकता कपूर अजूनही व्हर्जिन आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एक वेळ अशी होती जेव्हा एकताला वयाच्या १५ व्या वर्षी लग्न करायचे होते. एकताने सिंगल राहण्यामागील कारण एका मुलाखतीत सांगितले होते. एकताने मुलाखतीमध्ये सांगितले की, अविवाहित राहण्याच्या निर्णयामागे वडील जितेंद्र यांचा सल्ला होता. जितेंद्र यांनी एकताला दोन पर्यायांमधून निवड करण्यास सांगितले होते. एकता कपूरचे आई- वडिल असल्यामुळे तिचा हवा तसे लाड पुरवले गेले आहेत. पण, तिच्यावर एक वेळ अशी आली होती की, तिला तिच्या वडिलांनी पॉकेटमनी देणं बंद केलं होतं.
पैशाने भरलेली बॅग कुठे ? ‘गाडी नंबर १७६०’ रहस्य आणि विनोदी टीझर रिलीज; लवकरच उलगडणार रहस्य
एकताला जितेंद्र यांनी दोन पर्याय दिले होते. त्यापैकी एक तिला निवडायचा होता. जितेंद्र म्हणाले होते की, एकतर लवकर लग्न कर नाहीतर मला हवं तसं काम कर, पार्टी नाही. वडिलांच्या या बोलण्याचा एकतावर इतका खोल परिणाम झाला की, तिने एड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांच्याकडे इंटर्नशिप सुरू केली. अशा परिस्थितीत एकताने काम करण्याचा पर्याय निवडला आणि लग्न केले नाही. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर एकताने त्याच जाहिरात कंपनीत काम करायला सुरुवात केली. एकताची आवड पाहून वडिलांनी तिला काम सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले. पैसे मिळाल्यानंतर एकताने निर्माता म्हणून बालाजी टेलिफिल्म्समध्ये काम करायला सुरुवात केली. एकता प्रसिद्ध टेलिव्हिजन- सिनेनिर्माती, दिग्दर्शक आणि बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आहे. पण वयाच्या ५० व्या वर्षीही अविवाहित असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत एकता कपूरचे नाव आहे.
‘इबलिस’ कार्टी करणार रुपेरी पडद्यावर कल्ला, चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष
एकताला एका मुलाखतीदरम्यान “ती अजूनही अविवाहित का आहे ? तू कधी लग्न करणार आहे.” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना एकता कपूर नुसतेच हसून उत्तर दिले की, “सलमान खानचं लग्न झाल्यानंतर दोन-तीन वर्षांनी मी लग्न करेल.” एकता कपूरने दुसऱ्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, “वडील जितेंद्र यांच्या अटीमुळे तिने आजपर्यंत लग्न केले नाही. मला वडिलांनी सांगितले होते. एकतर तुला लग्न करावे लागेल किंवा तूला काम करावे लागेल. मी फक्त काम निवडले. मला लग्न करायचं नव्हतं म्हणूनच मी कामाला प्राधान्य दिलं. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत ज्यांचे लग्न झाले होतं, पण आता त्या सिंगल आहेत. गेल्या काही वर्षांत मी अनेक घटस्फोट पाहिले आहेत. माझ्याकडे सयंम आहे, हे मला कुठेतरी दिसते आहे, म्हणूनच मी आतापर्यंत वाट पाहत आहे.” २०१९ मध्ये सरोगसीद्वारे एकतानं आई झाली. एकतानं तिच्या मुलाचं नाव रवी कपूर ठेवलं आहे. रवी हे जितेंद्र यांचं खरं नाव आहे.