
येत्या 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्री राम मंदीराचं ( Ram Mandir Ceremony)उद्धघाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. यावेळी प्रभू रामल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अनेक बडे सेलेब्रिटी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, यावेळी अनेक बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सनाही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
[read_also content=”‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने 10 कोटीची दारूची जाहिरात नाकारली, यापुर्वीही मोठ्या ब्रँडला दिलाय नकार https://www.navarashtra.com/movies/allu-arjun-refuse-liqour-pan-ad-advertisemnet-of-10-crore-for-pushpa-2-nrps-489297.html”]
मिळालेल्या माहितानुसारनुसार, राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला बिग बी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, दिग्गज दिग्दर्शक राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी, रोहित शेट्टी आणि निर्माता महावीर जैन यांचा समावेश आहे. याशिवाय साऊथ सुपरस्टार रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष आणि ऋषभ शेट्टी यांच्यासह इतर सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
अयोध्येत रामललाचे तीन पुतळे बनवले जात आहेत. या मूर्ती भगवान रामाच्या 5 वर्षाच्या बालस्वरूपाच्या आहेत. पुतळेही जवळपास पूर्ण झाले आहेत. रामलल्लाच्या अभिषेकासाठी भारतातील सर्व राज्ये, सर्व भाषा, देशात ज्या ज्या काही पूजेच्या परंपरा आहेत, त्या सर्व परंपरांचे संत महंत, गुरु परंपरेसह प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला येणार आहेत. या कार्यक्रमात 4000 संतांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय क्रीडा जगत, कलाविश्व, कवी, लेखक, साहित्यिक, अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती, निवृत्त लष्कर, पोलीस अधिकारी अशा समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होणार आहे.