अभिनेता अक्षय कुमार तसेच अभिनेता टायगर श्रॉफ स्टारर फिल्म ‘बडे मिया छोटे मिया’ लवकरच आपल्याला घरबसल्या पाहता येणार आहे. आपल्या टीव्हीसमोर बसून प्रेक्षक या सिनेमाचे मनसोक्त आनंद लुटू शकणार आहेत. 27 ऑक्टोबर 2024 रोजी, या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियम होणार आहे. प्रेक्षकांना ‘बडे मिया छोटे मिया’ सोनी मॅक्सवर रात्री 8:00 वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, प्रीमियमच्या आधी अक्षय कुमारने टायगर श्रॉफवर विधान केले आहे.
हे देखील वाचा : Bigg Boss 18: बिग बॉसने दाखवला शिल्पाला आरसा, काय असेल आता पुढचं पाऊल?
हे विधान सध्या दोघांच्या चाहत्यांच्या दरम्यान चर्चेचे कारण बनले आहे. अक्षयने टायगर खऱ्या आयुष्यातदेखील लहान भावासारखा असल्याचे सांगितले आहे. त्याने टायगर बरोबर कामाचा अनुभव शेअर केला आहे. या दरम्यान, टायगरबद्दल प्रचंड कौतुक केले आहे. अनुभव सांगताना अक्षय म्हणतो कि, “टायगर मला माझ्या लहान भावासारखा आहे. मुळात, आमच्या दोघांची लगेच गट्टी जमली होती. आम्ही तासन् तास एकत्र असायचो, अटीतटीची ऍक्शन सीन करण्यापासून ते वॉलीबॉल आणि लुडो खेळून रिलॅक्स होण्यापर्यंत सारे काही गोष्टी आम्ही केले.
त्याचे वागणे अत्यंत व्यावसायिक आहे. मुळात म्हणजे मी त्याच्याकडून बरेच काही शिकलो. मी प्रामाणिकपणे सांगतो की, टायगरसोबत शूटिंगचे दिवस मला खूप आठवणार आहेत. फक्त चित्रपटात नव्हे तर प्रत्यक्ष जीवनात तो खरोखर माझा ‘छोटे’च आहे.” दिग्दर्शक अली अब्बास जफरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची गोष्ट अगदी रोमांचक आहे. यातील नेत्रसुखद सीन आणि जबरदस्त ऍक्शन प्रेक्षकांनी नक्कीच पाहिली पाहिजे. दोन माजी सैनिकांची गोष्ट सांगणारी ही कथा प्रेक्षकांनी जरूर पाहावी.
हे देखील वाचा : सोनम कपूर आणि आनंद आहुजाने खरेदी केले नीरव मोदीचे रिदम हाऊस, ठरली करोडोंची डील!
जगाला भयानक धोक्यापासून वाचवण्यासाठी सैन्यात दाखल झालेले हे दोन जवान आणि त्यांची गोष्ट आता पाहता येणार तेही फक्त 27 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी मॅक्सवर. ‘बडे मियां छोटे मियां’ म्हणजे ऍक्शन, कॉमेडी आणि नाट्य यांचे एक खुमासदार रसायन आहे, जे लहान-थोर सर्वांना नक्कीच भावेल! या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघायला विसरू नका.