Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय कुमारचा मुलगा चित्रपट क्षेत्रात येणार नाही? अक्षय म्हणाला, “तो चित्रपटांऐवजी फॅशन क्षेत्रात काम करायला इच्छुक…”

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारचा मुलगा लंडनमध्ये घेतोय शिक्षण, अक्षय म्हणाला, “मी माझ्या मुलाचा मित्र आहे''

  • By अमृता यादव
Updated On: Sep 29, 2025 | 06:50 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत आपला दबदबा राखत आहेत. नुकतच त्याचा‘जॉली एलएलबी 3’ चित्रपट रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात त्याच्याबरोबर अर्शद वारसी, अमृता रान महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. अक्षय कुमार त्याच्या चित्रपटामुळे किंवा त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत नाही, तर त्याच्या मुलाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

अक्षयचा मुलगा आरव अजूनही चित्रपटांच्या दुनियेतून दूर आहे आणि त्याने स्वतःच्या करिअरची वेगळी वाट धरली आहे. अक्षय कुमार हा त्याच्या फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी लोकप्रिय आहे. आता त्याच्या मुलांना शिस्त लावण्यात त्याचा किती वाटा आहे, त्याचे मुलांबरोबर कसे बॉण्डिंग आहे याबद्दल अभिनेत्याने वक्तव्य केले.

दिल्लीतील रामलीलामध्ये Bobby Deol करणार रावणाचा वध

अक्षयने सांगितलं की आरव १५ वर्षांच्या वयात शिक्षणासाठी लंडनला गेला. सध्या २३ वर्षांचा आरव चित्रपटांऐवजी फॅशन क्षेत्रात काम करायला इच्छुक आहे. अक्षय म्हणाला, “त्याने मला स्पष्ट सांगितलंय की तो चित्रपटात यायचं नाही. मी त्याला माझ्या प्रोडक्शन कंपनीचे काम सांभाळण्याचं सांगितलं, पण त्याला फॅशन डिझायनर व्हायचंय.”

अक्षयने पुढे सांगितले, “मी माझ्या मुलाचा मित्र आहे. तो २३ वर्षांचा आहे. तो लवकर मोठा झाला. तो सध्या शिक्षण घेत आहे आणि अभ्यास करण्यात व्यग्र आहे. त्याला कोणत्याही वाईट सवयी नाहीत. तो ट्विंकलसारखा आहे, कारण ट्विंकलसुद्धा सतत अभ्यास करत असते.”

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

अक्षयने आरवच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यासाठी एक पत्र लिहिले होते. त्याबद्दल अभिनेता म्हणाला, “तुझे वडील चित्रपटात अनेक सीनमध्ये पळत असतात. मी शूटिंगदरम्यानसुद्धा खूप पळत असतो, पण या सगळ्यात संयम महत्त्वाचा आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट काही क्षणात घडत नाही, तुला प्रत्येक गोष्ट पटकन मिळणार नाही.”

अक्षयच्या मुलाबद्दल बोलायचे तर तो वयाच्या १५ व्या वर्षी शिक्षणासाठी लंडनला गेला आहे. सध्या तो लंडनमध्ये फॅशन डिझाइनमध्ये कोर्स पूर्ण करत आहे.

Web Title: Akshay kumar says son aarav has refused to join films or run his production house reveals 23 yr old only studies says he has no bad habit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 06:42 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • bollywod news
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Force 3 मध्ये दिसणार साउथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री, बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री!
1

Force 3 मध्ये दिसणार साउथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री, बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री!

”१००० रूपये देते, मला १० वेळा किस कर…”सैफ अली खानने सांगितला विचित्र अनुभव
2

”१००० रूपये देते, मला १० वेळा किस कर…”सैफ अली खानने सांगितला विचित्र अनुभव

सिद्धांत चतुर्वेदी-त्रिप्ती डिम्रीचा ‘धडक 2’ नेटफ्लिक्सवर; चाहत्यांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
3

सिद्धांत चतुर्वेदी-त्रिप्ती डिम्रीचा ‘धडक 2’ नेटफ्लिक्सवर; चाहत्यांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

‘मुंज्या’नंतर आता ‘थामा’! मॅडॉक युनिव्हर्सचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला
4

‘मुंज्या’नंतर आता ‘थामा’! मॅडॉक युनिव्हर्सचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.