(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या मिश्कील आणि अनपेक्षित प्रश्नांसाठी ओळखला जातो. यापूर्वी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “तुम्ही आंबे कसे खाता?” असा गमतीशीर प्रश्न विचारला होता, जो चांगलाच गाजला होता. यावरून अक्षयला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले होते.मात्र, आता पुन्हा अक्षयनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक वेगळाच आणि मजेदार प्रश्न विचारला , ” तुम्ही संत्री कशी खाता? ” हा प्रश्न विचारला. या प्रश्नावर मुख्यमंत्री खळखळून तर हसलेच. पण सोबतच त्यांनी संत्री खाण्याची त्यांची आवडती पद्धतही सांगितली आहे.
हा प्रसंग घडला FICCI Frames 2025 या कार्यक्रमात, जिथे अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही उपस्थित होते.कार्यक्रमात गप्पा रंगताना अचानक अक्षयने हा प्रश्न विचारल्यावर उपस्थित सर्वजण खळखळून हसले. FICCI Frames च्या कार्यक्रमादरम्यान अक्षय कुमार म्हणाला, ”मी आयुष्यात दुसऱ्यांदा मुलाखत घेत आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती. तेव्हा मी त्यांना आंबा कसा खाता हा प्रश्न केला होता. त्यावेळी लोकांनी माझी खूप खिल्ली उडवली… पण तरी मी सुधरणार नाही… तुम्ही नागपूरचे आहात… मी तुम्हाला विचारणार आहे की, तुम्हाला संत्री कशी खायला आवडतात…? साल काढून खाता की मिक्सरमध्ये टाकून ज्यूस पिता?” अक्षयच्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्यासह कार्यक्रमात उपस्थित सर्वजण खळखळून हसले.
ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्ड्यांवर अभिनेत्री ऋतुजा बागवेचा संताप; सोशल मीडियावर केली खोचक पोस्ट
मुख्यमंत्री फडणवीस यांचं उत्तर मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेणारं आणि खास नागपुरी अंदाजातलं होतं. त्यांनी सांगितलं: “मी तुम्हाला एक नवी पद्धत सांगतो… संत्री असतात ना, त्याची साल अजिबात काढू नका. फक्त दोन भाग करा. त्यावर थोडंसं मीठ घाला आणि खा… अगदी जसं आंबा खातो तसं! ही पद्धत फक्त नागपूरच्याच लोकांना माहीत आहे!” असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. “संत्री खाण्याची ही पद्धत नव्याने शिकलो, मी नक्की ते ट्राय करेन” असं अक्षय कुमारने म्हटलं.
तरुणांचा वाढता कल लघुपट निर्मितीकडे; सामाजिक बदलाचे नवे माध्यम बनतेय Short Film