(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मुंबई आणि उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. विशेषतः ठाणे-घोडबंदर रोड हा तर खड्ड्यांसाठी प्रसिद्धच झाला आहे. पावसाळा असो वा उन्हाळा, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा रोजचा प्रवास म्हणजे एक मोठं संकट ठरतं आहे.या विषयावर केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर मराठी सेलिब्रिटीसुद्धा आपला आवाज उठवत आहेत. यापूर्वी अभिनेता आस्ताद काळे, मिलिंद फाटक, आणि अभिनेत्री सुरभी भावे यांनी रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
केएल राहुलने केली ‘कांतारा: चॅप्टर 1’ची स्तुती, सोशल मीडियावर भरभरून कौतुक
अभिनेता आस्ताद काळे, मिलिंद फाटक, अभिनेत्री सुरभी भावे यांसह अनेक कलाकारांनी वेळोवेळी आपल्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत. संताप व्यक्त करण्याबरोबरच रस्त्यांच्या या दुरवस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंतीसुद्धा अनेकदा केली आहे.अशातच सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली ऋतुजा हिने नुकतीच ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्ड्यांवर खोचक पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. तसंच कामानिमित्तची माहितीसुद्धा शेअर करीत असते. तिने आपल्या पोस्टमध्ये त्या रस्त्याची अवस्था दर्शवणारा व्हिडीओ शेअर करत प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलाय आणि “अत्यंत सुंदर रस्ता घोडबंदर रोड” असं खोचकपणे म्हटलं आहे. शिवाय या व्हिडीओवर ऋतुजाने प्रताप सरनाईक यांचा उल्लेख करीत “पाठीचा मणका अजून शाबूत आहे, म्हणून साष्टांग नमन” असंही लिहिलं आहे.
तरुणांचा वाढता कल लघुपट निर्मितीकडे; सामाजिक बदलाचे नवे माध्यम बनतेय Short Film
मराठी मनोरंजनविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. नृत्य, अभिनय आणि व्यक्तिमत्वाच्या जोरावर ऋतुजाने मराठीसह आता हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातही दमदार प्रवेश केला आहे. ऋतुजाने ‘स्वामिनी’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘तू माझा सांगाती’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय ती हिंदी टेलिव्हिजनद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘माटी से बंधी डोर’ मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. यासह तिने काही सिनेमांतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.