लेक पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांचं उड्डाण, शेअर केली खास पोस्ट, पाहा PHOTO!
अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आजही चांद्यापासून बांद्यापर्यंत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चर्चेत राहिल्या आहेत. गेल्या तीन दशकापासून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. आजही त्या सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. एवढंच नाही तर त्या सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. फोटो, व्हिडिओ लाईफ अपडेट इथे त्या शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी एक लेकीसोबतची पोस्ट केली जी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत अभिनेता आशुतोष गोखलेची एन्ट्री, दिसणार खलनायकी भूमिकेत
शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अलका कुबल यांनी आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर करत लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधलेय. अलका कुबल यांची लेक पायलट आहे. थेट आपल्या लेकीच्या विमानातूनच अभिनेत्री अलका कुबल यांनी विमानातून प्रवास केला आहे. आपल्या प्रवासाचा आनंद त्यांनी चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. अलका कुबल यांनी मुलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. अलका यांनी त्यांची मुलगी कॅप्टन असलेल्या विमानातून प्रवास केला आहे. याच निमित्ताने त्यांनी ही पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली.
फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये अलका यांनी लिहिलं, ‘आजच्या फ्लाईटसाठी माझी कॅप्टन…’ मुलगी ज्या विमानाची पायलट आहे, त्या विमानातून अलका यांना प्रवास करायला मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट पाहायला मिळत आहे. अलका यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून अलका यांचं आणि त्यांच्या मुलीचे कौतुक करत आहेत. अलका यांच्या मुलीचं नाव ईशानी असं असून ती घरातील सर्वात मोठी आहे. तिला लहानपणापासून विमानाची प्रचंड आवड होती. त्यामध्येच शिक्षण घेऊन ती पायलट बनली. इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं.
सलील कुलकर्णींनी लेकीसाठी वाढदिवसानिमित्त शेअर केली सुंदर पोस्ट, म्हणाले, “माझ्या जीवाची सावली…”
अमेय वाघ, सुकन्या मोने, पल्लवी पाटील, चैत्राली गुप्ते, हेमंत ढोमे यांसारख्या अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करत अलका कुबल यांच्या लेकीचे कौतुक केलं आहे. अलका कुबल यांना दोन मुली आहेत. पण आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात न येता त्या दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.