फवाद खान आणि माहिरा खानला 'ऑपरेशन सिंदूर' विरोधात बोलणं भोवलं, सर्वच पाकिस्तान कलाकारांना केली आजीवन बंदी
जम्मू- काश्मिरच्या पहलगाममध्ये करण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर केले. ७ मे आणि ८ मेच्या मध्यरात्री करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरवर हल्ला केला. लष्कराने पाकिस्तानातले १० ठिकाणचे दहशतवादी तळ नेस्तनाभूत केले. या हल्ल्यावर पाकिस्तानी कलाकारांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांनी शेअर केलेल्या ह्या पोस्ट आता त्यांनाच वादाच्या भोवऱ्यात टाकत आहे. त्यांनी शेअर केलेली पोस्टचा निषेध करत ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) स्वत: पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आहे.
फवाद खान आणि माहिरा खानने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरचा आणि भारताचाही अपमान केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध फक्त नेटकऱ्यांनीच केला असून ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) ही केला आहे. त्यासोबतच सर्वच पाकिस्तानी कलाकारांवरही भारतात आजीवन बंदी घालण्यात आली आहे.
AICWAने दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, “पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने भारतविरोधी विधान केले आहे. त्यांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूर आणि भारताविरोधी केलेल्या वक्तव्यांचा The All Indian Cine Workers Association (AICWA) निषेध करत आहे. दोघांनीही भारतावर टीका केली होती. भारताने देशातल्या नागरिकांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. माहिरा खानने भारतीय लष्कराच्या प्रतिसादाला ‘भ्याड’ म्हटले तर फवाद खानने दहशतवादाचा निषेध करण्याऐवजी भारताच्या कृतीवर टीका केली आणि फुटीरतावादी कथेचे समर्थन केले.”
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मेकअप आर्टिस्टचं निधन, वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
“पाकिस्तानी कलाकारांनी केलेले ही वक्तव्ये केवळ आपल्या देशाचा अपमान नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा आणि दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या निरपराध लोकांचाही अपमान आहे. AICWA ने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकार, चित्रपट निर्माते आणि फायनान्सर्सना भारतात काम करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोणताही भारतीय कलाकार कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराबरोबर काम करणार नाही, किंवा त्यांच्याबरोबर कोणतेही जागतिक व्यासपीठ शेअर करणार नाही,” असं एआयसीडब्ल्यूएने म्हटलं आहे. हे भारतीय कलाकारांना पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देणे थांबवण्याचे आवाहन आहे. ते उघडपणे ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देतात आणि त्यांच्या देशासोबत खंबीरपणे उभे राहतात.
‘जगाच्या नकाशावरुन त्यांना मिटवून टाका…’ भारत- पाकिस्तान युद्धावर अभिनेत्री कंगना रणौतची प्रतिक्रिया
भारतीय फिल्म इंडस्ट्रीने हे समजून घेतले पाहिजे की कलेच्या नावाखाली या कलाकारांना पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या अभिमानाचा विश्वासघात करण्यासारखे आहे. इंडस्ट्रीतील काही लोक आपल्या देशाच्या भावनांकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानी कलाकारांबद्दल सहानुभूती दाखवताना दिसत आहेत. AICWA ने अबीर गुलाल या चित्रपटाला लज्जास्पद उदाहरण म्हटले आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे. त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर देखील आहे. १४ फेब्रुवारी २०१९ साली झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतरही फवादला भारतातील चित्रपटांमध्ये घेतल्याचे निवेदनात लिहिले आहे. पत्रात असे लिहिले आहे की, भारतीय कलाकारांनी आणि चित्रपट निर्मात्यांनी ठरवावे की ते देशासोबत आहेत की देशाविरोधात आहेत.