Subodh Bhave Shared Post Pays Tribute To Vikram Gaikwad
प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन झालं आहे, ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीसह मराठी इंडस्ट्रीवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या मेकअप कौशल्याने अनेक पात्र जिवंत करणाऱ्या मेकअप आर्टिस्टच्या निधनाने अनेक नामवंत कलाकारांनी, निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. आता अशातच प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मेकअप आर्टिस्टचं निधन, वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योत्सना आणि मुलही तन्वी आहे. कोरोना काळामध्येच विक्रम यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यापासून ते आजारीच होते. आहेत. मात्र गेल्या ८ दिवसांपासून अचानक त्यांची तब्येत खालावल्याने त्यांच्यावर मुंबईतील पवईमधील सुप्रसिद्ध हिरानंदानी रुग्णलयात उपचार सुरु होते. उपचाराअंतीच त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गायकवाड यांचं निधन आज (१० मे शनिवार) सकाळी ८ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी मेकअप आर्टिस्टवर दादरच्या शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘जगाच्या नकाशावरुन त्यांना मिटवून टाका…’ भारत- पाकिस्तान युद्धावर अभिनेत्री कंगना रणौतची प्रतिक्रिया
दरम्यान, अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) सोशल मीडियावर विक्रम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विक्रम यांचा फोटो शेअर करत लिहिले सुबोधने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलेय की, “विक्रम दादा तुला भावपूर्ण श्रद्धांजली. तुझ्यासारखा कलावंत या मातीत घडला हे आमचं भाग्य. कितीतरी कलाकारांच्या आयुष्यात तू आशिर्वाद म्हणुन आलास आणि त्यांना त्यांच्या भूमिकेला भिडण्याचे धैर्य दिलेस. लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी कल्पनेत पाहिलेल्या व्यक्तिरेखांना तू तुझे खरे “रंग” दिलेस. माझ्या आयुष्यात बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर आणि तुला पाहते रे या सर्व कलाकृतींमध्ये तुझे योगदान अभूतपूर्व आहे. तुझ्याशिवाय या भूमिकांचा विचार ही मी करू शकत नाही. तुझ्या सारखा कलावंत आमच्या आयुष्यात आला आणि आम्हाला समृद्ध करून गेला. माझ्या साठी तू कायमच जिवंत आहेस. खूप मनापासून प्रेम आणि तुला वंदन विक्रम दादा. ओम शांती.”
दरम्यान, सुबोध भावेने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक सेलिब्रिटींकडूनही श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. रवि जाधव, अमृता खानविलकर, सायली संजीव, नीना कुलकर्णी, शिवानी सोनार, दिपाली विचारे, अवधूत गुप्ते यांनी मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.