Kangana Ranaut On Pakistan
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आता फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटताना दिसत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कराने पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये जोरदार हल्ला केला. भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराकडून जोरदार हल्ले- प्रतिहल्ले होताना दिसत आहे. दोन्हीही देश सीमेलगतच्या भागांवर सातत्याने हल्ले करताना दिसत आहे. पाकिस्तानकडून वारंवार हल्ला होत असताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आता चांगलीच संतापली आहे. तिने ‘जगाच्या नकाशावरुन त्यांना मिटवून टाका…’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तान सतत जम्मू- काश्मिर, गुजरात, हरियाणा आणि पंजाबमध्ये हल्ले करताना दिसत आहे. हा सर्व परिसर सीमेलगतच्या भागात आहे. पाकिस्तानच्या ह्या भ्याड कृत्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने एक प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यातील भूमिकेबद्दल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्तानला प्रश्न विचारला होता. त्या संबंधितचा रिपोर्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अभिनेत्री कंगना रणौत पाकिस्तानवर कमालीची संतापली आहे. अभिनेत्रीने दिलेल्या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
‘छावा’नंतर संतोष जुवेकर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीज
“संपूर्ण दहशतवाद्यांनी भरलेला एक दुष्ट देश… जगाच्या नकाशावरुन त्यांना मिटवून टाकायला हवं.” अशी प्रतिक्रिया कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दिली आहे. अभिनेत्री पाकिस्तानवर आणि ते करत असलेल्या कुरघोड्यांवर कमालीची संतापलेली पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यानंतर, कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्रामवर WION चा एक रिपोर्ट पुन्हा पोस्ट केला आहे. त्या रिपोर्टमध्ये, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील भूमिकेबद्दल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला प्रश्न विचारण्यात आला होता. तिने तो रिपोर्ट पोस्ट करत पाकिस्तानविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया दिली.
अक्षय केळकरने ‘रमा’सोबत अखेर संसार थाटला, लग्नातला पहिला फोटो समोर
भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानने ८ मे रोजी भारताच्या अनेक भागांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सशस्त्र दलांनी हाणून पाडला. जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू, सांबा, सतवारी आणि उधमपूर, पंजाबमधील अमृतसर आणि जालंधर आणि राजस्थानमधील बिकानेर आणि जैसलमेर या भागात हे ड्रोन हल्ले करण्यात आले. कंगनाने भारताच्या लष्करी प्रतिसादाचे समर्थन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अभिनेत्रीने अमृतसरजवळील एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये भारतीय S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे कौतुक करण्यात आले होते. दुसऱ्या एका पोस्टमध्ये अभिनेत्रीने जम्मूमधील नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यांना खंबीर राहण्याचे आवाहन केले. पोस्टमध्ये कंगना म्हणते, “जम्मू निशाण्यावर आहे! भारतीय हवाई दलाने जम्मूमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाडला. जम्मूमधील नागरिकांनो खंबीर राहा.”