Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन

रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद'च्या शतकमहोत्सवी 'अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना'निमित्त सुरू झालेला 'नाट्यकलेचा जागर' दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 11, 2025 | 09:28 PM
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन

Follow Us
Close
Follow Us:

रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यंदा पुन्हा राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सव म्हणजेच ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आला आहे असे परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले.

“मी वाटच बघत होतो, मला…” मराठी- हिंदी भाषेच्या वादावर अजय देवगणची प्रतिक्रिया; म्हणाला, “आता माझी…”

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी हा स्पर्धात्मक महोत्सव राज्यस्तरावर आयोजित केला असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.

मागील वर्षी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर यशस्वीरित्या सादर झाला. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा यांचा समावेश होता.

यावर्षी पासून दरवर्षी ‘नाट्य परिषद करंडक’ ह्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीने ठरविले आहे.

प्राजक्ता कोळीने रचला इतिहास! बनली TIME100 Creators मधील पहिली भारतीय डिजिटल क्रिएटर

ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अश्या दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ व रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ पासून विविध केंद्रांवर प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक २५ कलाकृतींची अंतिम फेरी मुंबई येथे दिनांक १५, १६, १७ व १८ सप्टेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, माटुंगा – माहीम, मुंबई येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे.

श्री महावतार बाबाजींची महती सांगणाऱ्या ‘फकिरीयत’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; रिलीज डेटही जाहीर…

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकांकिका स्पर्धा घेण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका येतील त्याठिकाणी स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या मधून मिळणार आहे.

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी रोख पारितोषिके

एकांकिका स्पर्धा सर्वोत्कृष्ट प्रथम रु.१,००,०००/-,

उत्कृष्ट द्वितीय रु.७५,०००/-, उत्तम तृतीय रु.५०,०००/,

दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रु.१५,०००/-

फिल्मफेअर 2025 बेस्ट सपोर्टींग अभिनेता ठरला क्षितीश दाते, ‘या’ चित्रपटासाठी मिळाले नामांकन

तसेच लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/रंगभूषा व वेशभूषा/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय वैयक्तिक रोख पारितोषिके (एकांकिका स्पर्धेसाठी) रु.७,०००/-, रु.५,०००/-, रु.३०००/- देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस सहभाग घेणाऱ्या संस्थांना सादरीकरण मानधन रु.२०००/- रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी कलावंत, तंत्रज्ञ यांना सहभागपत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रु.१०००/- ठेवण्यात आली आहे.

मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आणखी दोन आव्हान, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेला नवीन ट्रॅक

या स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून एकांकिका स्पर्धेची माहिती, नियमावली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक १० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, महाविद्यालय, हौशी संस्था, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: All india marathi natya parishad mumbai organized open state level one act play competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 09:28 PM

Topics:  

  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
1

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा
2

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा

“अखेर आज आमची इच्छा पूर्ण….”, संकर्षणने शेअर केला ‘त्या’ आजींसोबतचा भावूक व्हिडिओ…
3

“अखेर आज आमची इच्छा पूर्ण….”, संकर्षणने शेअर केला ‘त्या’ आजींसोबतचा भावूक व्हिडिओ…

फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२५ च्या नामांकनांची यादी जाहीर; ‘पाणी’, ‘फुलवंती’ आणि ‘घरत गणपती’ सह अनेक चित्रपट शर्यतीत
4

फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२५ च्या नामांकनांची यादी जाहीर; ‘पाणी’, ‘फुलवंती’ आणि ‘घरत गणपती’ सह अनेक चित्रपट शर्यतीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.