अमेय वाघ आणि अमृता खानविलकरचा‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट आता ओटीटीवर येणार, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार रिलीज…
व्लॉगरच्या रहस्यमय आणि धक्कादायक जगातील कथा सांगणारा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट आता प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. चित्रपटात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, आणि विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात व्लॉगरच्या आयुष्यातील गूढ आणि धक्कादायक घटनेचा थरार दाखवला आहे, जो प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतो.
हे देखील वाचा- पोलिसांच्या कार्याची महती रुपेरी पडद्यावर येणार, ‘कवच’ चा मोशन पोस्टर रिलीज
चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, “प्रेक्षक आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’ प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. या चित्रपटातून व्लॉगरच्या आयुष्यातील रहस्य आणि थरार पाहाणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल.” निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणतात, “आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांसाठी प्राईम व्हिडीओवर उपलब्ध केला आहे. या रहस्यमय कथेचा आता घरबसल्या आनंद घेता येईल.” ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा आताच्या काळाचा चित्रपट आहे. उत्कंठावर्धक कथानकामुळे हा चित्रपट खिळवून ठेवतो, काहीतरी वेगळे पाहाण्याचा अनुभव आला, मराठीत असा प्रयत्न कौतुकास्पद आहे, अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून सध्या येत आहेत.
सिंगापूरमधील प्रेक्षकांकडून आलेल्या या प्रतिक्रिया चित्रपटाच्या टीमला भारावणाऱ्या होत्या. या चित्रपटाला फक्त देशातच नाही तर, परदेशातही दमदार प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमीयर नुकताच सिंगापूरमध्ये पार पडला. या शोला सिंगापूरमधील मराठमोळ्या प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. यावेळी प्रेक्षकांनी चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, अभिनय आणि लेखनाचे भरभरून कौतुक केले. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे.
चित्रपटामध्ये अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे आणि विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.