Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर पाकिस्तानी कलाकारांच्या तंगड्या मोडू’, अमेय खोपकरांचा निर्मात्यांना इशारा

अमेय खोपकर आणि मनसे पूर्वीपासून भारतीय चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी काम करण्याच्या विरोधात आहेत. त्यांनी पुन्हा हा विरोध करत निर्मात्यांना ताकीद दिली आहे.

  • By साधना
Updated On: Jun 30, 2023 | 03:08 PM
ameya khopkar

ameya khopkar

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून अनेक चित्रपटांमुळे वाद सुरु आहेत. अशातच ‘72 हूरें’(72 Hoorain) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून नवीन वाद सुरु झाला आहे. या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेते रशीद नाज (Rasheed Naaz) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपटामध्ये दिसल्याने हा वाद आणखी वाढला आहे. यासंदर्भात आता मनसे (MNS) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी देखील ट्विट केले आहे.

अमेय खोपकर आणि मनसे पूर्वीपासून भारतीय चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी काम करण्याच्या विरोधात आहेत. त्यांनी पुन्हा हा विरोध करत निर्मात्यांना ताकीद दिली आहे.

भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच
फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम…

— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 30, 2023


अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय. पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सिरीजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ. त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील.”

यापूर्वी फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्यावरून वाद झाला होता. फवाद ‘ए-दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये दिसणार होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. तेव्हा मनसेच्या मागणीनंतर कारण जोहरने चित्रपटामध्ये फवादचे सीन काढून टाकले होते. या चित्रपटादरम्यान पाकिस्तानच्या भारताविरोधात वाढलेल्या कारवायांमुळे फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांना विरोध सहन करावा लागला.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने 2019 मध्ये चित्रपट उद्योगात काम करणार्‍या पाकिस्तानी कलाकारांवर संपूर्ण बंदी जाहीर केली होती. मात्र तरीही काही निर्माते त्यांना संधी देत असल्याचं समोर येत आहे.

Web Title: Ameya khopkar tweet about pakistani artist in indian movie nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2023 | 03:05 PM

Topics:  

  • ameya khopkar
  • Maharashtra Navnirman Sena

संबंधित बातम्या

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा
1

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

अमेय खोपकरच्या लेकाचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘येरे येरे पैसा ३’ मधलं ‘उडत गेला सोन्या’ थेट हृदयाला भिडणारं गाणं प्रदर्शित
2

अमेय खोपकरच्या लेकाचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘येरे येरे पैसा ३’ मधलं ‘उडत गेला सोन्या’ थेट हृदयाला भिडणारं गाणं प्रदर्शित

सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा धमाकेदार लाँच!
3

सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा धमाकेदार लाँच!

Dombovali : 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी
4

Dombovali : 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.