(फोटो सौजन्य - x अकाउंट)
‘स्टार प्लस’ वाहिनी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येत असते. त्यांच्या आनंदात ही वाहिनी स्वतःचा आनंद मनात आली आहे. ‘तू धडकन मैं दिल’ हा लोकप्रिय शो या रविवारी एका खास संगीतमय भागासह पडद्यावर शोची शोभा वाढवणार आहे. विशेष म्हणजे या एका तासाच्या विशेष भागात, शोचे कलाकारच नव्हे तर संगीत विश्वातील एक प्रसिद्ध नाव, आदित्य नारायण देखील रंगमंचावर दिसणार आहे. आदित्य नारायण देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.
या संगीतमय प्रवासात काय खास आहे?
हा विशेष भाग एका भव्य संगीतमय मैफिलीवर आधारित असणार आहे. या विशेष भागात प्रेक्षकांना संगीत आणि भावनांचा जबरदस्त संगम पाहायला. चाहत्यांना एकाच मंचावर एक नाही तर अनेक आवडत्या पात्रांना पाहण्याची संधी मिळेल. हा विशेष भाग प्रेक्षकांसाठी नक्कीच खास ठरणार आहे. त्यांचे भभरून मनोरंजन होणार यात शंकाच नाही.
सलमान खानच्या आणखी एका क्रिप्टिक पोस्टने वेधले लक्ष, ‘भाईजान’ चा नक्की कोणाकडे इशारा?
या संगीतमय कार्यक्रमात, आदित्य नारायण रॉकस्टार राघव, दिल आणि तिची निरागस मांजरी देखील दिसणार आहे. इतकेच नाही तर स्टार प्लसच्या इतर लोकप्रिय शोमधील पात्रे देखील या मंचावर सहभागी होणार आहेत. ‘कभी नीम नीम कभी शहाद शहाद’ ची कथा आणि ‘झनक’ ची अदिती या संगीतमय प्रवासाचा भाग होणार आहेत.
केवळ सादरीकरणच नाही तर नात्यांचे नवे ठोकेही जोडले जातील
हा भाग केवळ एक संगीत कार्यक्रम नसून, पात्रांच्या नात्यात नवीन रंग भरेल. संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांना केवळ हृदयाचे ठोके ऐकायला मिळणार नाहीत तर अनेक मनोरंजक ट्विस्ट आणि भावनिक क्षण देखील पाहायला मिळतील. रॉकस्टार राघव त्याच्या अभिनयाने मने जिंकेल आणि दिल-म्यावची निरागस शैली रंगमंचावर गोडवा आणेल, तर कथा आणि अदितीची एंट्री शोला आणखी खास बनवेल.
या एक तासाच्या विशेष भागासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना आदित्य नारायण म्हणाला की, “स्टार प्लससोबत पुन्हा एकदा काम करताना मला खरोखर आनंद होत आहे. ही पुन्हा एकदा परतून घरी आल्यासारखे वाटत आहे. ‘तू धडकन मैं दिल’च्या विशेष भागात सहभागी होण्यात एक परिपूर्ण आनंद होता तो म्हणजे, सौरभ राज जैन यांनी साकारलेला रॉकस्टार राघव.”
जय भानुशालीसोबत घटस्फोटाच्या अफवांवर संतापली माही विज, म्हणाली ‘तुमचं माझ्याशी नातं काय ?’
या मालिकेच्या अनोख्या उत्साही वातावरणाबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “मी अलीकडेच या मालिकेचा प्रोमो पाहिला आणि मला हे आवर्जून सांगायचे आहे की, पडद्यावर असे ताजेतवाने चैतन्य आणि हृदयस्पर्शी कथन पाहण्याचा अनुभव खूपच जबरदस्त आणि वेधक आहे. या मालिकेचा आमच्यासोबतचा हा संगीतमय प्रवास देखील प्रेक्षकांकरीता तितकाच जबरदस्त आणि वेधक असेल आणि याकरता मी उत्सुक आहे.” चाहत्यांचे आभार मानताना आदित्य म्हणाला की, “माझ्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे, तुमच्या निरंतर प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.