Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाईक आणि सबस्क्राईब’ची परदेशात तुफान क्रेझ, ‘या’ देशात तिकिटबारीवर प्रेक्षकांची झुंबड

अमेय वाघ आणि अमृता खानविलकर स्टारर 'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमीयर नुकताच सिंगापूरमध्ये पार पडला. या वर्ल्ड प्रिमीयरला सिंगापूरमधील मराठमोळ्या प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 15, 2024 | 07:24 PM
'लाईक आणि सबस्क्राईब'ची परदेशात तुफान क्रेझ, 'या' देशात तिकिटबारीवर प्रेक्षकांची झुंबड

'लाईक आणि सबस्क्राईब'ची परदेशात तुफान क्रेझ, 'या' देशात तिकिटबारीवर प्रेक्षकांची झुंबड

Follow Us
Close
Follow Us:

‘लाईक आणि सबस्क्राईब’चा वर्ल्ड प्रिमीयर नुकताच सिंगापूरमध्ये पार पडला. चित्रपटामधील कलाकार अमेय वाघ, जुई भागवत, राजसी भावे आणि दिग्दर्शक अभिषेक मेरूकर यांनी प्रीमियरला उपस्थिती दर्शवली होती. या खास शोला सिंगापूरमधील मराठमोळ्या प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असून प्रेक्षकांनी चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, अभिनय, लेखनाचे भरभरून कौतुक केले.

हे देखील वाचा – स्पृहा जोशीने आई- वडिलांचा फोटो शेअर करत चाहत्यांचे मानले आभार, नेमकं काय झालं ?

‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा आताच्या काळाचा चित्रपट आहे. उत्कंठावर्धक कथानकामुळे हा चित्रपट खिळवून ठेवतो, काहीतरी वेगळे पाहाण्याचा अनुभव आला, मराठीत असा प्रयत्न कौतुकास्पद आहे, अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून सध्या येत आहेत. सिंगापूरमधील प्रेक्षकांकडून आलेल्या या प्रतिक्रिया चित्रपटाच्या टीमला भारावणाऱ्या होत्या.

याबद्दल दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणाले, “चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर सिंगापूरमध्ये पार पडल्यानंतर मनाला थोडी धाकधूक होती की, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील? परंतु प्रत्यक्षात आपण दिग्दर्शन केलेल्या चित्रपटावर रसिकांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय, हे आनंददायी आहे. आता संपूर्ण जगात ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट चर्चेत येईल आणि शोज हाऊसफुल्ल जातील, याची मला नक्कीच खात्री वाटते.”

हे देखील वाचा – “अलविदा अतुल”, अतुल परचुरेंच्या निधनानंतर किरण मानेंनी शेअर केली खास पोस्ट

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Amruta khanvilkar and amey wagh starrer like aani subscribe marathi movie was released in singapore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 07:24 PM

Topics:  

  • Amey Wagh
  • Amruta Khanvilkar

संबंधित बातम्या

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त
1

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त

अमृताने पटकावला पहिला वहिला राज्य चित्रपट पुरस्कार, आनंद व्यक्त करत म्हणाली ‘माझ्या महाराष्ट्राने दिलेली…’
2

अमृताने पटकावला पहिला वहिला राज्य चित्रपट पुरस्कार, आनंद व्यक्त करत म्हणाली ‘माझ्या महाराष्ट्राने दिलेली…’

“सुंदरी” चा सातासमुद्रापार डंका! मराठमोळ्या अमृता खानविलकरने केले परदेशात लावणीचे सादरीकरण!
3

“सुंदरी” चा सातासमुद्रापार डंका! मराठमोळ्या अमृता खानविलकरने केले परदेशात लावणीचे सादरीकरण!

केदारनाथवरून आल्यावर लावावं लागलं सलाइन, अमृता खानविलकरची बिघडली तब्येत!
4

केदारनाथवरून आल्यावर लावावं लागलं सलाइन, अमृता खानविलकरची बिघडली तब्येत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.