
अनन्याच्या घरी आला गोंडस मुलगा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे हिच्या घरी एका गोंडस बाळाचा जन्म झालाय. अलाना पांडे आणि तिचा पती इव्होर मॅकक्रे आता एका मुलाचे पालक झाले आहेत. अलाना पांडेने तिच्या मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी एका व्हिडिओद्वारे दिली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या बाळाची पहिली झलकही दाखवली आहे.
तर अभिनेत्री अनन्या पांडे सध्या अत्यंत आनंदी आहे. कारण ती मावशी झाली असून तिने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये ही आनंदाची बातमी शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. अनन्या आपला हा आनंद जगासमोर व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीये (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
अलानाने शेअर केला क्यूट व्हिडिओ
आता अलाना पांडेने एक क्यूट व्हिडिओ शेअर करून आपल्या मुलाची गोड बातमी दिली आहे. नुकतीच झालेली आई आणि वडिलांनी ब्लू कलर ट्विनिंग केले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अलाना आणि इव्होर यांनी लिहिले आहे की, “आमचा लहानसा फरिश्ता आलाय.” अलानाने काही महिन्यांपूर्वीच बेबी शॉवर केला होता त्यावेळी बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते.
अनन्या पांडेचा आनंद
अलाना पांडेच्या या व्हिडिओवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट करून अभिनंदन केले आहे. जिब्रान खान, चित्रपट निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने अलानाचे अभिनंदन केले आहे. तर आपला आनंद व्यक्त करत इन्स्टा स्टोरीमध्ये अलानाचा व्हिडिओ शेअर करताना अनन्या पांडेने लिहिले की, ‘माझा सुंदर मुलगा, भाचा आला आहे.’ अनन्या सध्या खूपच खुष असल्याचे दिसून येत आहे.
कोण आहे अलाना पांडे
तुम्हाला सांगतो की अलाना पांडे ही अनन्या पांडेचे वडील चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे आणि मेहुणी डीन पांडे यांची मुलगी आहे. अलाना पांडे पती इव्होर मॅकक्रेसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. अलाना मॉडेलिंग करते. अलाना 1.6 दशलक्ष फॉलोअर्स असून ती इन्फ्लुएन्सर म्हणून काम करते. लवकरच ती ‘द ट्राईब’ या प्राईम व्हिडिओच्या रियालिटी शो मध्ये दिसणार असून टॉप मीडिया इन्फ्लुएन्सरबाबत ही सिरीज असणार आहे.