Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंकिता लोखंडेचं खरं नाव माहितीये का? फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी केलेला नावात बदल

झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' मालिकेतून लोकप्रितेच्या शिखरावर पोहचलेली अंकिता लोखंडे आज आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अंकिता लोखंडेचं खरं नाव अंकिता नसून आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या...

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 19, 2024 | 07:45 AM
Ankita Lokhande Photos

Ankita Lokhande Photos

Follow Us
Close
Follow Us:

झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून लोकप्रितेच्या शिखरावर पोहचलेली अंकिता लोखंडे आज आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक रिॲलिटी शो, टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणाऱ्या अंकिताने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनेत्रीने ‘बिग बॉस १७’ मध्येही सहभाग घेतला होता. तिने ‘बिग बॉस १७’मध्ये टॉप ५ मध्ये आपलं स्थान पक्कं केलं होतं, पण तिला फायनलिस्टची ट्रॉफी मिळाली नाही.

शर्वरी वाघ बनली गोदरेज प्रोफेशनलचा चेहरा; नेटकऱ्यांनी केलं सौंदर्याचं कौतुक

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आता बॉलिवूडमध्ये देखील आपले नाव कमवत आहे. मात्र, अंकिताचं खरं नाव अंकिता नसून वेगळंच आहे. ज्यावेळी तिने इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं त्यावेळी तिने स्वतःचं नाव बदलून घेतलं. अंकिता लोखंडेला खरी प्रसिद्धी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेने दिली. पण मालिकेत तिचं ‘अर्चना’ असं नाव होतं. घराघरातून प्रसिद्धीझोतात राहिलेल्या अंकिताचं खरं नाव तनुजा लोखंडे असं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अंकिताने तिचं नाव बदलले होते. तिच्याही घरात तिला अंकिता ह्या नावाने हाक मारली जायची. म्हणूनच तिने खऱ्या नावाऐवजी याच नावाने मनोरंजन विश्वात येण्याचा निर्णय घेतला होता.

 

खरंतर अंकिताला केव्हाच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण, ती ओघाओघाने ती या क्षेत्राकडे वळाली. अंकिता लोखंडेला अभिनेत्री बनण्याऐवजी एअर होस्टेस व्हायचे होते. त्यासाठी तिने फ्रँकफिन अकादमीत प्रवेशही घेतला होता. त्याच दरम्यान ती राहत असलेल्या इंदूरमध्ये झी- सिनेस्टारच्या एका मालिकेच्या कलाकारांसाठी ऑडिशन ठेवण्यात आल्या होत्या. त्यात तिने आपले नशीब आजमावले आणि तिची निवड झाली. तेव्हापासून तिच्या मनात अभिनयाची आवड निर्माण झाली आणि तिने हळूहळू अभिनयाबद्दल विचार करायला सुरुवात केली. त्यानंतर २००४ मध्ये अंकिता मुंबईत आली आणि तिने मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेतली. अंकिता लोखंडे ‘बाली उमर को सलाम’ या शोमधून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पण तिचा तो शो केव्हाच टेलिकास्ट झाला नाही.

जागतिक स्तरावर पोहचलेल्या छाया कदमचा न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज…

त्यानंतर अंकिताला एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. त्या मालिकेत अभिनेत्रीने अर्चनाच्या भूमिकेतून स्वत:ची वेगळी ओळख मिळवली. अनेक वर्षे टीव्हीवर काम केल्यानंतर अंकिताने ‘मणिकर्णिका’ या बॉलिवूड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात ती कंगना रणौतसोबत दिसली होती. कंगनाच्या या चित्रपटानंतर ती ‘बागी ३’मध्ये झळकली होती. त्यानंतर अभिनेत्रीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातही काम केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती कोणत्याही प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. दरम्यान, इंदूरमधील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या अंकिताचं ‘पवित्र रिश्ता’ मालिकेनंतर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतसोबत नाव जोडलं गेलं होतं. पण त्यांचं २०१६ मध्ये ब्रेकअप झालं.

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता तुटली होती आणि अशा परिस्थितीत विकी जैन तिचा आधार बनला. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि २०१९ मध्ये विकीने अंकिताला लग्नासाठी प्रपोज केले. विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचे डिसेंबर २०२१ मध्ये विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघेही ‘स्मार्ट जोडी’ शोमध्ये एकत्र दिसले आणि त्याचे विजेते ठरले.

प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी दिसणार कधीही न पाहिलेल्या अंदाजात, ‘जिलबी’चा दमदार टिझर प्रदर्शित

Web Title: Ankita lokhande is celebrating her 40th birthday did you know actress changed her name before coming in industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 07:45 AM

Topics:  

  • ankita lokhande

संबंधित बातम्या

‘माझ्या सुख- दुःखात तू…’ प्रियाच्या अचानक जाण्याने अंकिता भावुक; मैत्रिणीसाठी शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट
1

‘माझ्या सुख- दुःखात तू…’ प्रियाच्या अचानक जाण्याने अंकिता भावुक; मैत्रिणीसाठी शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

‘त्या माझं कुटुंब आहेत…’ अंकिता लोखंडेच्या मदतनीसची मुलगी बेपत्ता, FIR केली दाखल
2

‘त्या माझं कुटुंब आहेत…’ अंकिता लोखंडेच्या मदतनीसची मुलगी बेपत्ता, FIR केली दाखल

अंकिता लोखंडे खरंच आहे प्रेग्नेंट? ‘मला या प्रश्नांचा कंटाळा आलाय…’, पती विकी जैनने पहिल्यांदा सोडले मौन
3

अंकिता लोखंडे खरंच आहे प्रेग्नेंट? ‘मला या प्रश्नांचा कंटाळा आलाय…’, पती विकी जैनने पहिल्यांदा सोडले मौन

अंकिता आणि विकी जैन लवकरच करणार त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत? अभिनेत्रीने दिली गुड न्यूज
4

अंकिता आणि विकी जैन लवकरच करणार त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत? अभिनेत्रीने दिली गुड न्यूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.