मुंज्या या चित्रपटातून बॉलिवूडच्या सृष्टीत पदार्पण करणारी आणि पुढे लागतात काही सिनेमे देत भारतातील तरुणांच्या हृदयाचा ठोका वाढवणारी अभिनेत्री शर्वरी वाघ गोदरेज प्रोफेशनलचा चेहरा बनली आहे. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच तिच्या या यशासाठी सिनेचाहत्यांनी कौतुकाची रंगच लावली आहे. तिचे हे फोटोज तिने @sharvari या इंस्टाग्राम हॅन्डलवर शेअर केले आहेत.
अभिनेत्री शर्वरी वाघने शेअर केला तिचा नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री शर्वरी वाघने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवा फोटोशूट शेअर केला आहे. गोदरेज प्रोफेशनलचा चेहरा म्हणून हा तिचा पहिलाच फोटोशूट आहे.
अभिनेत्रीने अगदी कमी वेळात भारतभर आपले नाव प्रसिद्ध केले आहे. तिच्या सौंदर्याची जादू देशातील प्रत्येक तरुणावर झाली आहे.
त्या जादूमध्ये आणखीन भर म्हणून अभिनेत्रीचे हे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहेत. छायाचित्रांमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे. श्वेत रंगाच्या या आउटफिटमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
तिच्या हास्याने तिच्या सौंदर्यात आणखीन भर टाकली आहे. चेहऱ्यावर हास्य असणे किती महत्वाचे आहे हे पटवून देणारे उत्तम उदाहरण म्हणजे हे छायाचित्र आहेत.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे. तसेच तिच्या या यशासाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आणि अभिनंदन करण्यात आले आहे.