विचित्र चेहरा अन् सुजलेले डोळे... अरमान मलिकला काय झालं ?
‘बिग बॉस ओटीटी फेम अरमान मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरमान मलिकने दोन्ही बायकांसोबत बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. अनेकदा वैयक्तिक कारणामुळे चर्चेत राहणारी मलिक फॅमिली सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. ब्लॉगच्या माध्यमातून ते चाहत्यांना कायम खासगी लाईफबद्दल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल माहिती शेअर करत असतात. नुकतंच अरमानची पहिली बायको पायलने एक ब्लॉग शेअर केला. या ब्लॉगमध्ये नेमकं त्याच्या डोळ्यांना काय झालं आहे. याबद्दलची माहिती तिने चाहत्यांना दिली आहे.
हे देखील पाहा – अमिताभ बच्चनने केले पंकज त्रिपाठीचे कौतुक, म्हणाले- ‘त्यांचे चित्रपट पाहतो आणि शिकतो’!
शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये, अरमानचा चेहरा आणि त्याचे डोळे सुजलेले दिसले होते. पायलने दिलेल्या माहितीनुसार, Conjunctivitis म्हणजेच डोळे वैगेरे आलेले नसून डोळ्यांना कसलं तरी इन्फेक्शन झालेलं आहे. लवकरच आम्ही डॉक्टरांकडे डोळ्यांच्या ट्रीटमेंटसाठी जाणार आहोत. ब्लॉगमध्ये पायलने सांगितले की, डोळे सुजल्यामुळे अरमान रात्रभर जागाच होता.
शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये, चाहत्यांकडून अरमान लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते देवाकडे प्रार्थना करीत आहेत. पायलने खरंतर हा ब्लॉग सोशल मीडियावर गोकुळाष्टमीनिमित्त शेअर केलेला होता. ब्लॉगमध्ये पायल आणि अरमान आपल्या मुलांसोबत दिसत आहे. शिवाय त्यांनी फोटोही शेअर केलेला आहे.