(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
सुदीप शर्मा निर्मित, क्राइम ड्रामा ‘कोहरा’ गेल्या वर्षी ओटीटीवर प्रदर्शित झाला होता, ज्यात बरुण सोबती आणि सुविंदर विकी यांच्या मुख्यभूमिका पाहायला मिळाल्या आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. अशा परिस्थितीत आता निर्मात्यांनी या मालिकेचा दुसरा भागही जाहीर केला आहे. यावेळी अभिनेत्री मोना सिंगही या सिझनमध्ये एन्ट्री करणार आहे.
नेटफ्लिक्सने ‘कोहरा’चा सीझन 2 केला जाहीर
मंगळवारी सकाळी नेटफ्लिक्सने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये अभिनेत्री मोना सिंग आणि बरुण सोबती दिसत आहेत. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक नवीन रहस्य, एक नवीन तपास, धुके लवकरच साफ होईल. ‘कोहरा सीझन 2 लवकरच येत आहे, फक्त नेटफ्लिक्सवर.” असे लिहून ही पोस्ट नेटफ्लिक्सने शेअर केली आहे.
काय होती कोहराची कथा ?
‘कोहरा’ हा चित्रपट एका अनिवासी भारतीयाच्या मृत्यूच्या शोधावर आधारित आहे. पोलीस एनआरआयच्या मृत्यूचे सह्स्य शोधताना दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये सुविंदर विकी, बरुण सोबती, वरुण बडोला आणि हरलीन सेठी आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. सुविंदर विकी आणि बरुण सोबतीच्या या मालिकेत दोन पोलीस मारेकऱ्याला पकडण्यासाठी त्यांच्या शोधात दिसले. आता सीझन 2 मध्ये नक्की काय कथा दाखवणार आहे हे समजणे चाहत्यांसाठी उत्कंठाचे झाले आहे.
हे देखील वाचा- Stree 2 Credit War : ‘स्त्री २’च्या सक्सेसचं क्रेडिट नक्की कोणाला ? अपारशक्ती खुरानानंतर अभिषेक बॅनर्जीनेही व्यक्त केली मनातली खदखद
अभिनेत्री मोना सिंगची कारकीर्द
मोना सिंग शेवटची पडद्यावर ‘मुंज्या’ चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने आईची भूमिका साकारली होती. याआधी अभिनेत्रीने लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली आहे, तिने ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या शोमध्ये अभिनेत्रीने जस्सीची भूमिका केली होती. हा शो 2003 ते 2006 पर्यंत सुरु होता. यानंतर अभिनेत्रींच्या करिअरला सुरुवात झाली.