(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस १९’च्या घरात नेहमीच काही ना काही ड्रामा घडत असतो, पण यावेळी प्रेक्षकांच्या लक्षात राहिल असा एक भावनिक क्षण समोर आला आहे. अभिनेत्री अशनूर कौर हिला सलमान खानने सुनावल्याचा प्रसंग इतका तीव्र होता की, तिचे आई-वडीलदेखील भावनिक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस १९’ची स्पर्धक असलेली अशनूर कौरला ‘वीकेंड का वार’च्या शेवटच्या आठवड्यात सलमान खानकडून बोलणं सहन करावे लागलं. या घटनेनंतर प्रेक्षकांनी सलमान खान आणि शोच्या निर्मात्यांवर पक्षपात केल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर टीका केली. अशनूरचे वडील गुरमीत सिंग आणि आई अवनीत कौर यांनी एका मुलाखतीत त्या भागाबद्दल मोकळेपणाने काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले, ”या भाग पाहिल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं, ते दोघेही रात्रभर झोपलं नाहीत. त्यांना या घटनेचा मानसिक दृष्ट्या खूप त्रास झाला”
अशनूरचे वडील पुढे म्हणाले,”हा आमच्यासाठी खरंच अभिमानाचा क्षण आहे, कारण यात आमच्या दोघांचं कष्ट दिसून येतं. तिच्या आईने तिला नेहमीच स्वाभिमान आणि सौजन्याने वागणं शिकवलं, आणि आम्ही दोघांनीमिळून तिला चांगले शिक्षण देखील दिलं आहे. ह्याच गोष्टी तिच्या स्वभावाचा भाग बनल्या आहेत. मला हे स्पष्टपणे दिसतं की ती मोठ्यांशी आदराने वागते, आपली मतं ठामपणे मांडते आणि कधीही चुकीची भाषा वापरत नाही.”
‘आईला वाचवा…’ पुणे-सातारा प्रवासादरम्यान प्रियदर्शिनीचा अपघात, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
अशनूरच्या आईने सांगितलं की, “प्रामाणिकपणे सांगायचं तर अशनूरने याआधी कधीच ‘बिग बॉस’ पाहिलेला नाही. मी मात्र मागचे काही सीझन्स पाहिले आहेत, पण अशनूर आणि तिच्या वडिलांनी हा शो कधीच पाहिला नव्हता.म्हणूनच तिला हेही माहीत नव्हतं की ‘कन्फेशन रूम’ म्हणजे काय असतं. जेव्हा कुनिका जीने ‘सुरसुरी’ वाला कमेंट केल्याचं सांगितलं, तेव्हा बसीरने अशनूरला सुचवलं की, जर तुला काही चुकीचं वाटत असेल, तर तू कन्फेशन रूममध्ये जाऊन फुटेज मागू शकतेस. तेव्हाच तिने ‘कन्फेशन रूम’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.आम्हाला सगळ्यात जास्त आश्चर्य हे वाटलं की, तिने किती समजूतदारपणे ही संपूर्ण गोष्ट हाताळली.मी इंडस्ट्रीमध्ये गेली १५ वर्षे आहे, आणि सतत तिच्यासोबत राहून तिचं मार्गदर्शन करत आले आहे.मला नेहमी वाटायचं की तिला निर्णय घेण्याआधी माझ्या सल्ल्याची गरज भासते.पण यावेळी तिने स्वतः सिद्ध केलं की ती किती स्वतंत्र आणि समजूतदार आहे.”