गायिका सुनिधी चौहान यांची गाण्यातून वडिलांना साद
वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा शब्दांतून व्यक्त करणं तसं अवघडच. जन्मापासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वडिलांची साथ, पाठिंबा महत्त्वाचा असतो याची जाणीव मुलींना नक्कीच असते. या सुंदर नात्यावर आधारलेलं एक गीत लवकरच आपल्या भेटीला येत आहे. आगामी ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटातील हे गीत सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने गायलंय.
का रे बाबा … का रे पप्पा
कुठे हरवल्या तुझ्या छान-छान गप्पा….
तू सांग ना तू सांग ना
तू सांग ना…. हा माझ्या बाबा
असे बोल असलेलं हे गीत अरविंद भोसले यांनी लिहिलं असून श्रेयस देशपांडे यांचे संगीत गीताला लाभले आहेत. बाप लेकीचे भावनिक नाते उलगडणारं ‘अवकारीका’ चित्रपटामधील ह्रदयस्पर्शी गाणं ‘आपल्या आयुष्यात असलेले वडिलांचे स्थान आणि त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट या सर्वांची जाणीव करुन देते. येणाऱ्या ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने हे गीत वडील मुलीच्या नात्यासाठी सुंदर भेट ठरेल. हे गीत गाताना खूप मजा आली. प्रेक्षकांच्या अंतर्मनाचा ठाव हे गाणं घेईल, असा विश्वास गायिका सुनिधी चौहान यांनी व्यक्त केला.
ईशा देओलने मुलीच्या वाढदिवशी केला प्रेमाचा वर्षाव, कपाळावर किस घेत शेअर केला क्युट फोटो!
रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला भेटीला येणाऱ्या ‘अवकारीका’ चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.