Sudha Murty Reviews Sitaare Zameen Par Calls Aamir Khan Comedy-drama Movie An Eye-opener
सध्या आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट कमालीचा चर्चेत आहे. येत्या २० जूनला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ह्या चित्रपटाची सोशल मीडियासह सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा असणाऱ्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बॉलिवूडचा मिस्टर परफेरक्शनिस्ट म्हणून सर्वत्र फेमस असणारा अभिनेता आमिर खान आहे. आमिरसोबत चित्रपटामध्ये, १० नवोदित कलाकारांचाही समावेश आहे. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला समाजसेविका, लेखिका आणि खासदार सुधा मूर्ती उपस्थित होत्या. चित्रपट पाहून त्यांनी सर्व कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे कौतुक करीत ‘सितारे जमीन पर’ अनेकांचे डोळे उघडणारा चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले.
ईशा देओलने मुलीच्या वाढदिवशी केला प्रेमाचा वर्षाव, कपाळावर किस घेत शेअर केला क्युट फोटो!
“‘सामान्य’ म्हणजे काय, हाच एक तत्त्वज्ञानात्मक प्रश्न आहे. पण या चित्रपटात या मुलांचं जीवन खूप सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. ते खूप संवेदनशील आणि निष्कलंक असतात. त्यांच्या जगण्याची पद्धत खूप सोपी असते आणि ते सदैव हसत असतात. एखाद्याला एखादं यश मिळालं तरी हे मुलं त्यामध्ये आनंद मानतात. विशेष मुलांकडून शिकण्यासारख्या खूप तत्त्वज्ञानात्मक गोष्टी आहेत आणि या गोष्टी चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटाचा समाजातील नागरिकांवर प्रभाव पडून समाजात मोठा बदल घडु शकतो. तसेच लोकांना संवेदनशील बनवू शकतो. या मुलांकडे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच पाहिले पाहिजे आणि हा दृष्टिकोन समाजात रूजणे महत्त्वाचे आहे.”, अशी प्रतिक्रिया इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी दिली आहे.
मुलांच्याच आयुष्यातील महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श करणारा, पालक आणि मुलांमधील संवादाचे महत्त्व पटवून देणाऱ्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिर खानने २००७ साली केले होते. त्यानंतर ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाची निर्मिती केली. आता तो पुन्हा एकदा लहान मुलांनाच एकत्र घेऊन केलेला ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे १० उदयोन्मुख तारे झळकत आहेत.
‘हेरा फेरी ३’ बनणार की नाही? सुनील शेट्टीने एका वाक्यात सगळंच सांगितलं, म्हणाला…
तर प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे गीते अमिताभ भट्टाचार्य, संगीत शंकर-एहसान-लॉय आणि पटकथा दिव्य निधी शर्मा यांची आहे. चित्रपटाचे निर्माते आमिर खान आणि अपर्णा पुरोहित असून, सहनिर्माते बी. श्रीनिवास राव आणि रवी भगचंदका आहेत.सितारे जमीन पर हा चित्रपट फक्त चित्रपटगृहांमध्ये २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.