Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gopichand Padalkar Song: “आमच्या नादाला लागण्याआधी…”; आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग!

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे नवे गाणे 'आमच्या नादाला लागण्याआधी... एकदा होळकरशाही आठवा' प्रदर्शित झाले आहे. अवघ्या २४ तासांत १.५ लाख व्ह्यूज मिळवत या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 09:37 PM
आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग! (Photo Credit- X)

आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • “आमच्या नादाला लागण्याआधी…”;
  • आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग
  • गाण्याने सोशल मीडियावर लावली आग!
Gopichand Padalkar News Song: आपल्या आक्रमक राजकीय शैलीसाठी ओळखले जाणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता कलाक्षेत्रातही आपली छाप पाडली आहे. राजकारणातील आक्रमक भाषणांनंतर आता पडळकर एका जबरदस्त गाण्यामुळे चर्चेत आले असून, २ फेब्रुवारी रोजी त्यांचे “आमच्या नादाला लागण्याआधी… एकदा होळकरशाही आठवा” हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील त्यांचा लूक आणि वावर पाहून चाहते थक्क झाले आहेत.

भव्य निर्मिती आणि दमदार अभिनय

या गाण्याची निर्मिती एखाद्या बिग बजेट चित्रपटाप्रमाणे भव्य दिव्य पद्धतीने करण्यात आली आहे. गाण्यात पडळकर स्वतः मुख्य भूमिकेत असून त्यांचा वावर एखाद्या व्यावसायिक अभिनेत्याला टक्कर देणारा आहे. गाण्याचे लेखन सचिन माळी यांनी केले असून गाणं मिलिंद शिंदे यांनी गायलं आहे. तर मिलिंद शिंदे, शीतल साठे आणि अनिकेत मोहिते यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. गाण्यातील नृत्य, कला दिग्दर्शन आणि गोपीचंद पडळकर यांचा पडद्यावरील वावर एखाद्या व्यावसायिक अभिनेत्याला टक्कर देणारा असल्याचे चाहते म्हणत आहेत.

‘100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले’; गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका

सोशल मीडियावर दीड लाखांहून अधिक व्ह्यूज

गाणे प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या २४ तासांत याला १.५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर हे गाणे तुफान व्हायरल होत असून, समर्थकांनी कमेंट बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. कार्यकर्त्यांमध्ये हे गाणे नवा उत्साह भरत असल्याचे चित्र दिसत आहे.

होळकरशाहीच्या वारशाला उजाळा

पडळकर नेहमीच धनगर आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरतात. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी होळकरशाहीच्या शौर्याला आणि स्वाभिमानी वारशाला उजाळा दिला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजाला एकत्र बांधण्यासाठी हे गाणे एक ‘अस्त्र’ ठरू शकते, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे खंबीर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकीय प्रवासात नेहमी चढ-उतार पाहायला मिळाले. धनगर आरक्षणासाठी राज्यभर रान उठवणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली, मात्र नंतर भाजपमध्ये घरवापसी केली. २०१९ मध्ये अजित पवारांविरुद्ध बारामतीतून निवडणूक लढवली होती. पण सध्या ते भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद आमदार म्हणून कार्यरत आहेत.

माझ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करा; पडळकरांचा विरोधकांना टोला

Web Title: Gopichand padalkar new song holkarshahi viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • gopichand padalkar
  • viral Song

संबंधित बातम्या

Vijay Deverakonda च्या वाढदिवसानिमित्त ‘राणाबली’ची खास झलक; शेअर केले ‘अश्ववीर’च्या भूमिकेतील शूटिंगच्या वेळचे BTS
1

Vijay Deverakonda च्या वाढदिवसानिमित्त ‘राणाबली’ची खास झलक; शेअर केले ‘अश्ववीर’च्या भूमिकेतील शूटिंगच्या वेळचे BTS

“माझे वडील पोलिस आहेत “ वडिलांच्या निवृत्तीनिमित्ताने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची खास पोस्ट
2

“माझे वडील पोलिस आहेत “ वडिलांच्या निवृत्तीनिमित्ताने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची खास पोस्ट

Jai Jai Swami Samarth : अक्कलकोटमध्ये अवतरणार ‘प्रति-पंढरपूर’! स्वामींच्या लीलेसमोर मार्तंडचा डाव धुळीला मिळणार
3

Jai Jai Swami Samarth : अक्कलकोटमध्ये अवतरणार ‘प्रति-पंढरपूर’! स्वामींच्या लीलेसमोर मार्तंडचा डाव धुळीला मिळणार

Ranabaali चित्रपटातील O Mere Saajan गाण्याचा जलवा, Social Media वर धुमाकूळ, तब्बल 100K+ Reels!
4

Ranabaali चित्रपटातील O Mere Saajan गाण्याचा जलवा, Social Media वर धुमाकूळ, तब्बल 100K+ Reels!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.