मुंबई: पेप्सीने (Pepsi) आज एक नवे समर अँथम लाँच (Pepsi Summer Anthem Launch) केले आहे. ते अँथम तुमच्या पुढच्या पार्टीचा उत्साह वाढवण्यासाठी सज्ज आहे. ‘हर घूँट में स्वॅग’ कॅम्पेनचाच विस्तार करणाऱ्या या अँथममध्ये भारतातील सर्वात मोठे यूथ आयकॉन्स बादशाह आणि जॅकलिन फर्नांडिस दिसत आहेत. मुंबईत आज सकाळी एका झगमगत्या सोहळ्यात हे अँथम लाँच करण्यात आले. यावेळी, तरुणांच्या कानात सदैव गुंजत राहील अशा या नव्या मास्टरपीसच्या ठेक्यावर जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) आणि बादशाह (Badshah) यांनी ताल धरला.
‘पेप्सी’ची ‘मोअर फिझ, मोअर रिफ्रेशिंग’ ही संकल्पना आणखी उंचावर नेणारे हे ठेकेबाज नवे अँथम तरुणाईला त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, त्यातील खास गुणवैशिष्ट्ये यांचा स्वीकार करण्याला उत्तेजन देते. प्रेमात पडण्यासाठी सज्ज राहायला सांगते. तरुणाईच्या मस्ती आणि मौजभरल्या आयुष्याच्या अवतीभवती या अँथमची रचना करण्यात आली आहे. या मोहिमेला मूर्त स्वरूप देण्यासाठी पेप्सीने वन डिजिटल एंटरटेनमेंट आणि युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसोबत भागीदारी केली आहे.
या अँथमविषयी सौम्या राठोड, कॅटेगरी लीड, कोला, पेप्सिको इंडिया, म्हणाल्या, “संस्कृती संवर्धक या नात्याने पेप्सीने संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून ग्राहकांशी वेळोवेळी नाते जोडले आहे आणि जगभरात खास तयार केलेल्या प्रबळ सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सर्वात आयकॉनिक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. ‘चेक माय फिज’ (Check My Fizz) या गीताचे शब्द आजच्या युगातील तरुणांच्या अढळ आत्मविश्वास आणि विश्वासाला साजरे करणारे आहेत. बादशाहच्या बीट्सवर जॅकलीन फर्नांडीसचा पडद्याला आग लावणारा डान्स आणि बॉलिवुडचा जबरदस्त नृत्यदिग्दर्शक, दिग्दर्शक अहमद खान याचे व्हिडिओला लाभलेले दिग्दर्शन यामुळे सगळा भारत हे गाणे गुणगुणू लागेल, याची आम्हाला खात्री आहे.”
बादशाह म्हणाला, “पेप्सीच्या नव्या समर अँथमचा पुन्हा एकदा भाग बनत असल्याबद्दल मी फार उत्साहित आहे. मी स्वत: एक अट्टल चॅलेंजर आहे आणि पेप्सीची, आपला स्वॅग जपण्याची आणि आयुष्य भक्कम आत्मविश्वासाने जगण्याची चॅलेंजर फिलॉसॉफी मला स्वत:शी जुळणारी वाटते. हे गाणे तयार करताना मला जेवढा आनंद मिळाला, तेवढा तो लोकांनाही मिळेल, अशी मी आशा व्यक्त करतो!”
[read_also content=”गडकरींनी दिली एलोन मस्कला नवी ऑफर, आता भारतात बनणार टेस्लाची वाहने? https://www.navarashtra.com/india/gadkari-gave-a-new-offer-to-elon-musk-now-tesla-vehicles-will-be-made-in-india-275332/”]
या गाण्याविषयी जॅकलिन फर्नांडीस म्हणाली, “आमची पिढी सगळ्या निर्णयांची जबाबदारी विश्वासाने आणि आत्मविश्वासाने घेणारी आहे, मग ती त्यांची मते असोत, कपड्यांची निवड असो की त्यांची कारकीर्दीची दिशा असो. हीच फिलॉसॉफी अतिशय स्टायलिश पद्धतीने एका अप्रतिम गाण्यातून पुढे नेणाऱ्या पेप्सीच्या नव्या समर अँथमचा भाग असल्याने मी अगदी थरारून गेले आहे. हे गाणे संगीतक्षेत्रात झंझावात आणेल, याची मला खात्री आहे. हे गाणे अतिशय सहजसुंदर असून ते अतिशय ठेकेबाज आहे आणि तरुणाईशी नाते जोडणारे आहे. नृत्याचे पदन्यास, वेषभूषा, रंगसंगती या सगळ्यातून या गाण्याची टवटवी वाढली आहे. माझे चाहते कधी एकदा या स्वॅगचा अनुभव घेतात, अशी उत्सुकता मला लागली आहे.”
बॉलिवुडचे आघाडीचे दिग्दर्शक अहमद खान म्हणाले, “हे नवे समर अँथम हे एक सुपरकूल नृत्यगीत आहे आणि त्यात आजच्या निर्भीड, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वॅग से भरपूर तरूण पिढीचे प्रतिबिंब उमटलेले आहे. आम्ही हीच वृत्ती या म्युझिक व्हिडिओमध्ये प्रदर्शित केली आहे. जॅकलिन आणि बादशाह यांच्याबरोबर काम करताना मला फार मजा आली आणि ती सगळी धमाल स्क्रीनवर आलेली आहे. आम्ही पेप्सीसोबत पुन्हा एकदा केलेली जादू अनुभवण्याची मलाही फार उत्सुकता आहे.”
हे गीत यूट्यूब आणि अन्य स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.






