“ती कोणाचंही करिअर उद्ध्वस्त करू शकते”; प्रसिद्ध अभिनेत्रीचं एकता कपूर विरोधात मोठं विधान...
‘कितनी मस्त है जिंदगी’ मालिकेतून टिव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट प्रसिद्धी झोतात आली आहे. या मालिकेतूनच अभिनेत्रीने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले होते. मात्र, सुरुवातीच्या काळात बरखाला या क्षेत्रात खूप संघर्ष करावा लागला होता. नुकतीच तिने एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीत तिने तिच्या सुरुवातीच्या काळाबद्दल भाष्य केलं आहे. स्ट्रगलच्या दिवसांबद्दल बरखाने एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. अवघ्या २३ व्या वर्षी ‘बालाजी टेलिफिल्म्स’चा शो सोडल्यानंतर तिला अडचणी आल्या. त्याबद्दल बरखानं तिची प्रतिक्रिया दिली आहे.
मराठमोळी, थोडीसी साधी भोळी… रिधिमाचा Swag असा भारी, पाहता घायाळ पोरं सारी
‘बालाजी टेलिफिल्म्स’ची मालिका सोडल्यानंतर निर्माती एकता कपूरने अभिनेत्रीविरुद्ध खटला दाखल केला होता. बरखाने हा खटला स्वतः लढला आणि घरी काहीही सांगितले नाही. एकता कपूरने तिच्याविरोधात का खटला दाखल का केला होता? यामागील कारणाचाही तिने खुलासा केला आहे. दरम्यान, बरखा बिष्टने सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली आहे. निर्माती एकता कपूरविरुद्ध दिलेल्या न्यायालयीन लढ्याबद्दल बरखाने यावेळी सांगितलं की, “मी घरी कोणालाही काहीही सांगितले नाही. मी एकाची वकिलाची मदत घेतली आणि तो संपूर्ण खटला लढले.”
महाकुंभातील मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय ?
“कालांतराने एकताला कळलं की, हे व्यर्थ आहे. मी तिची आभारी आहे कारण, तिनं माघार घेतली. त्यावेळी एकतामध्ये समोरच्याचं करिअर घडवण्याची आणि तोडण्याची ताकद होती आणि ती तिच्यात आजही आहे. ती ते करु शकते. हा खटला जवळजवळ एक वर्ष चालला आणि मी माझ्या नवीन शोचं शुटिंग चालू ठेवलं आणि प्रत्येक न्यायालयीन सुनावणीला मी उपस्थित राहायचे.” बरखा बिष्टने पुढे सांगितले की, मी माझ्या परिवाराला या प्रकरणाची माहिती सांगितली नाही. तो म्हणाला, ‘घरी भांडण करून मुंबईमध्ये आल्यानंतर, मी परत जाऊन तक्रार करू शकत नाही.’
‘आंबट शौकीन’ कुटुंबाची रंजक गोष्ट, पाहायला मिळणार तीन मित्रांची धमाल गोष्ट; मोशन पोस्टर रिलीज
पुढे बरखाने सांगितलं की, “मी मोठ्या अभिमानाने सांगून आले होते की, मी जे काही करेल, ते मी स्वतः करेल. स्वत:च्या हिमतीवर करेल. त्यामुळे मला ते स्वतःलाच हाताळावं लागलं. एक नवीन कलाकार म्हणून माझी कारकीर्द संपू शकली असती; पण काही दैवी शक्तीमुळे एकता मागे हटली. जर तिला हवं असतं, तर ती माझं करिअर संपवू शकली असती.”
बरखा बिष्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, बरखा शेवटची ‘पॉवर ऑफ पाँच’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या प्रोजेक्टमध्ये बरखाशिवाय, रिवा अरोरा, जयवीर जुनेजा, आदित्य अरोरा, बियांका अरोरा, यश सहगल आणि उर्वशी ढोलकिया मुख्य भूमिकेत होती. ही सीरीज जानेवारी २०२५ मध्ये Disney Plus Hotstar वर रिलीज झाली होती.