हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये तिच्या सुंदर अभिनयाने नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री रिधिमा पंडित तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. नवनवीन पोस्ट टाकत असते आणि त्या पोस्टला चाहतेही भरभरून प्रतिसाद देतात. पोस्टखाली कॅप्शनमध्ये अगदी कौतुकांचा वर्षाव करतात. हा वर्षाव पुन्यांदा पाहायला मिळत आहे.
रिधिमाचा मराठी Swag पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री रिधिमा पंडितने तिच्या @ridhimapandit या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसून येत आहे.
अभिनेत्रीने मराठमोळा साज शृंगार केला आहे. 'नाकात नथनी, कपाळी चंद्रकोर...संस्कृती मानाने जपते महाराष्ट्राची ही पोर...'
गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी तिने हा साज शृंगार केला असून इंस्टाग्रामवर तुफान करत आहे. अभिनेत्रीने पोस्टला सुंदर असते कॅप्शन दिले आहे.
कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने नमूद केले आहे की,'महाराष्ट्रीयन असण्याचा अभिमान आहे, संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणारं मन आहे! गर्व आहे मला माझ्या मराठमोळ्या असण्याचा!'
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव तर केलाच आहे त्याचबरोबर अभिनेत्रीला भरभरून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.