संतोष देशमुखांच्या मुलाला भेटून आमिर खान भावूक! कडकडून मारली मिठी; किरण म्हणाली, 'हिंमत कायम..'
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेने अवघा महाराष्ट्र राज्य हळहळला आहे. घटनेला आज १०५ दिवस झाले आहेत. इतके दिवस होऊनही या प्रकरणातील आरोपींना अटक करून खटला सुरु असला तरी या प्रकरणातील प्रमुख आरोपांपैकी एक असलेला कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. या घटनेने राज्याचं राजकारण संपूर्ण ढवळून निघालं आहे. याप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे.
“ब्लॉकबस्टर चित्रपट…”; Kesari 2 चा धमाकेदार टीझर पाहून चाहत्यांनी दिली जबरदस्त प्रतिक्रिया!
गेल्या काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटोही समोर आले होते. ते पाहून संतोष देशमुखची ज्या पद्धतीने क्रूरपणे हत्या करण्यात आली ते पाहून अंगावर काटा आला. या प्रकरणी संतोष देशमुखला न्याय मिळावा यासाठी धनंजय देशमुख आणि मस्साजोग गावकरी सरकारी दरबारी न्यायाची मागणी करीत आहे. धनंजय देशमुख (संतोष देशमुख यांचे लहान भाऊ) सध्या न्यायालयात सातत्याने या घटनेचा पाठपुरावा करत आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमिरने देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.
काल मस्साजोग येथे प्रसिद्ध अभिनेते अमीर खान यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना आधार दिला..#JusticeForSantoshDeshmukh pic.twitter.com/EI9CguknjM
— विजय खवरे (@vk4676) March 24, 2025
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि दिग्दर्शक किरण राव यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट पुण्यात घेतली. पुण्यात भेटीचं कारण म्हणजे, पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम… त्याचं झालं असं की, पुण्यातील बालवाडी स्टेडियममध्ये रविवारी (२३ मार्च) दुपारी पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पाणी फाऊंडेशनच्या ‘फार्मर कप पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांचा लहान मुलगा विराजही उपस्थित होते. यावेळी अमिर खान आणि किरण राव यांनी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि धनंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले.
अजय देवगण पुन्हा एकदा आयकर अधिकाराच्या भूमिकेत दिसणार, Raid 2 ची प्रदर्शन तारीख जाहीर!
आमिरने आणि किरणने यावेळी दोघांचंही सांत्वन केलं. शिवाय, भेटीदरम्यान आमिरने धनंजय देशमुख यांच्याकडून संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. सर्व घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर आमिर खान भावूक झाला होता. त्यानंतर आमिरने सरपंच संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुखला कडाडून मिठी मारली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शिका किरण रावने धनंजय देशमुख यांना, ‘हिंमत कायम ठेवा’ असा सल्ला दिला. त्यावर आमिरनेही, ‘होय’ असं म्हणत किरणच्या सल्ल्याशी आपण सहमत असल्याचं दर्शवलं.