(फोटो सौजन्य - अकाउंट)
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा आयकर अधिकाऱ्याच्या भूमिकेत बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी येत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आणि अनेक तारखांमध्ये बदल झाल्यानंतर, अजय देवगणच्या २०१८ मधील ‘रेड’ चित्रपटाचा सिक्वेल ‘रेड २’ आता प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. अजय देवगणने आज चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आणि चाहत्यांना खुश करून टाकेल आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
अजय देवगणने इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्रामवर ‘रेड २’ चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे आणि चित्रपटाच्या नवीन प्रदर्शन तारखेचीही घोषणा केली आहे. पोस्टर रिलीज करताना अजयने कॅप्शनमध्ये लिहिले, “नवीन शहर, नवीन फाईल आणि अमय पटनायक यांचा एक नवीन रेड. ‘रेड २’ १ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल होणार आहे.” असं लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे.
वाढदिवशी विशाखा सुभेदारला मिळालं खास सरप्राईज; पोस्ट लिहित म्हणाली, “गेल्या अनेक वर्षात…”
रितेश देशमुख आणि वाणी कपूर देखील दिसणार
‘रेड २’ चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त रितेश देशमुख, वाणी कपूर आणि सौरभ शुक्ला हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता हे करणार आहेत. या चित्रपटाची कथा आणि संपूर्ण स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता प्रेक्षकांना हा चित्रपट १ मे ला सिनेमागृहात पाहता येणार आहे.
चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली
यापूर्वी ‘रेड २’ च्या प्रदर्शनासाठी अनेक तारखा देण्यात आल्या होत्या, परंतु चित्रपट पुढे ढकलण्यात आला. यापूर्वी हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर त्याचे प्रदर्शन २१ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आले. मात्र, त्यानंतरही हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता चित्रपटाची नवीन प्रदर्शन तारीख जाहीर झाली आहे. चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण दिल्ली आणि लखनऊमध्ये झाले आहे.
जॅकलिन फर्नांडिसची आई आयसीयूमध्ये दाखल, संपूर्ण कुटूंबाची रुग्णालयात हजेरी!
‘रेड’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता
‘रेड २’ हा २०१८ मध्ये आलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘रेड’ हा चित्रपट १९८० मध्ये उत्तर प्रदेशातील एका बलवान माणसाच्या घरावर झालेल्या छाप्याच्या कथेवर आधारित होता. हा छापा अनेक दिवस चालला, जो भारतीय इतिहासातील सर्वात मोठा छापा मानला जात असे. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. ‘रेड’ मध्ये अजय देवगणसोबत इलियाना डिक्रूझ आणि सौरभ शुक्ला सारखे कलाकार दिसले होते.